Posts

Showing posts from December, 2022

अशक्य हा शब्द दुबईच्या शब्दकोशात नाही..

Image
          सिद्धार्थ टूर्स अॕन्ड ट्रॕव्हल्सकडून ठरलेली स्थळं दररोज दाखवण्यात येत होती. संध्याकाळी आॕर्कीड व्ह्युव्ह हाॕटेलवर आल्यावर मी आणि सौ रात्री उशिरापर्यंत पुन्हा दुबई जेवढी पाहता येईल तेवढी हावऱ्यासारखं पाहून घेत होतो. कधी सोबत बंधू निखील तर कधी ब्रिजकिशोर राठौरसर, रेखा राठौरमॕडम हे असायचे. बाजारपेठेतील विक्रेत्यांशी दुकानदारांशी बोलून माहिती घ्यायचो.           खास करुन इथली राजेशाही, शासक, जनमत आणि कायदे व अंमलबजावणी याबाबत केवळ आजवर ऐकून होतो. शारजहा विमानतळावर उतरल्यापासून ते अगदी रास-अल-खैमाह आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मायदेशी परतेपर्यंत एकाही चौकात, हमरस्त्यावर 'समर्थ साथ, खंबीर नेतृत्व, आमचे मार्गदर्शक, वा कर्तव्य अन् जबाबदारीच्या मार्केटींगचे' आपल्याकडे सर्रास दिसणारे एकही फ्लेक्स दिसला नाही. दिसले ते केवळ दोनवेळा संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, दुबईचे शासक आणि राजे शेख मुहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचे केवळ डिजिटल छायाचित्र!        डेझर्ट सफारीला जाताना...

जगात जे-जे पिकतय त्यातील सर्वोत्तम इथे विकतय

Image
       आपल्या कृषीप्रधान विशाल भारत देशातील आणि छोट्या पण वाहतूक आणि व्यापार केंद्र असणाऱ्या दुबईमधील फळ-भाजी मार्केट कसे असेल? हा कुतुहलाचा प्रश्न होता. या प्रश्नाची उकल करण्यासाठी रात्री उशिरा फळ-भाजी मार्केटमध्ये पोहोचलो. मासळी बाजारप्रमाणेच हे ही एक विस्तीर्ण माॕल सदृश्य एकदम मस्त मार्केट होते. जगभरातून इथे मोठी आवक होताना दिसली. जागोजागी कलिंगडे, टरबूज-खरबूज, द्राक्षे, डाळिंबे, केळी, हिरवी आणि नेहमीच्या लालसर रंगातील सफरचंद, अंजीर, पेरु, आॕलिव्ह, चिंच, अलबुखार अशी नानाविध फळांची ढिगारे रचलेले दिसत होते.           इथल्या बाजारात येणाऱ्या फळांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्यं म्हणजे भारत, चिन, इराण, इराक, अफगाणिस्तान, थायलंड अशा कितीतरी देशातून अगदी सर्वोत्तम दर्जाची, आकाराची, क्षमतेची फळे, फळ भाजी विक्रीस आलेली होती. विविध देशातून आलेली कितीतरी प्रकारची मधाळ द्राक्षे होती. आपल्याकडे  सर्वसाधारण आकारात असणारी ही सर्वच फळे इथे मात्र, नेहमीपेक्षा कितीतरी मोठी होती.        अगदी द्राक्षांचा आकार ...

मासळी बाजार..छे हो..स्वच्छ, प्रशस्त माॕलच..!

Image
        दुबई हे एक व्यापारी आणि वाहतूक केंद्र आहे. रात्री उशिरा मुद्दाम इथला मासळी बाजार पहायला गेलो. रात्री पावणेबारा वाजता पोहचलो. खरंतर येणाऱ्या उग्र वासावरुनच जवळपास असणाऱ्या मासळी बाजारचे अस्तित्व आपल्याकडे जाणवते. दुर्गंधी तर सोडाच, इथं एखाद्या माॕलमध्ये आल्याचे जाणवत होते.           बाजाराच्या प्रवेश लाॕबीत छतावर मास्याची सुंदर अंतर्गत सजावट केलेली. ही साजेशी कलात्मकता जाम आवडली. आत प्रवेश केला. सगळीकडे गारवा जाणवत होता. विक्रेत्यांचे ओटे एका ओळीत लावलेले. सर्वकाही चकाचक दिसत होते. कोठेही दुर्गंधी वा अवशेष-कचरा दिसत नव्हता. काही वेळातच मास्यांचा लिलाव सुरु होणार होता.          मोठ-मोठे विविध प्रकारचे मासे, बोंबील, कोळंबी, खेकडे, रंगीत शिंपले, आॕक्टोपस यांनी क्रेटच्या क्रेट भरले होते. बर्फाच्या अंथरुणावर हे मासे छानसे पहुडले होते. काही किंग फिश अर्थात सुरमई मास्यांवर बर्फाचे पांघरुण घालणं सुरु होतं. घरातील फिश टँकसाठीचा रंगीत मास्यांचा स्वतंत्र विभाग होता. तेथे छोट्या-मोठ्या टँकमध्ये गोल...

आधुनिक, स्वप्नवत सोबतच वसवली पुरातन दुबई.!

Image
          अंतराळात शिरणारा बुर्ज खलिफा, नवा चेहरा २१ कॕरेट सोन्याची फ्रेम, समुद्रात जमीन निर्माण करुन वसवलेलं जुमेराह पाम बीच, सप्त तारांकित बुर्ज अल अरब हाॕटेल, भविष्यकालीन वेध घेणारं अदभूत 'फ्युचर म्युझीयम' अशा आश्चर्यकारक वास्तू निर्माण करुन दुबईने आपली जगात खासियत जपली आहे. त्यासोबतच चक्क पुरातन दुबई वसवून आधुनिकतेला जुन्याची सांगडदेखील घातली आहे.           आभाळात डोके खुपसणाऱ्या इमारती बांधून जगाचे लक्ष वेधताना जुन्या परंपरेतील, संस्कृतीतील दुबईचे अस्तित्व दाखवणारी वसाहत नवा आयाम देत हुबेहूब साकारली आहे. जसं समुद्रात भर टाकून नवी वसाहत स्थापन केलीय, तसंच आवश्यक तेवढा समुद्राचा प्रवाह गावात आणून त्या काठावर ही पुरातन वसाहत बसवलीय.          अगदी आपल्याकडे जशी होती, अजूनही काही खेड्यांमध्ये असणारी ही गावसंस्कृती येथे देखील होती, ते यामधून पहायला मिळते. रात्री १२ वाजता येथे पोहोचलो. त्यावेळी दुकाने, बाजारपेठ बंद झाली होती. काही सुरु असणारी हाॕटेल बंद होत होती. मात्र, विजेचा झगमगाट तसाच का...

डेझर्ट सफारी, धाडसी फायर शो आणि बेली डान्स

Image
        वाळवंटातील जहाज म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो म्हणजे उंट होय. खरंतर राजस्थानमध्ये सर्वत्र आढळणारी ही उंटावरील सफारी दुबईत मात्र, उंटासोबत छायाचित्रे काढणे इथपर्यंतच मर्यादित राहिली. आतापर्यंत केवळ चित्रपटात पाहिलेली 'क्वाड बाईक' आणि चार चाकी वाहनातून होणारी 'डेझर्ट सफारी' प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली.           प्रत्येक वाहनात सहा पर्यटकांना घेवून चारचाकी वाळवंटी निघाली. मुंग्यांची रांग चालावी तशी सगळी वाहने सरळ एका रेषेत निघाली होती. पहिला पडाव पडला तो वैयक्तिक वा कपलसाठी असणाऱ्या क्वाड बाईकवरुन होणाऱ्या सफारीसाठीचा. त्यानंतर पुढे चारचाकी वाहनातून मरुभूमीतील सफारीसाठी निघालो. निघण्यापूर्वी चालकाने चाकातील हवा कमी केली. थोड्या वेळातच चाकांनी पिवळ्या-मातकट वाळूला स्पर्श केला. आता ती वाळूच्या टेकड्या, त्यावरील चढण आणि उतार यावरुन वेग पकडत धावत होती. आतमध्ये सीटबेल्टच्या कवेत बसूनही तो चढ-उताराचा, वळणा-वळणाचा जोरकस अनुभव आम्हाला मिळत होता.          वळणावरुन जाताना वाळूचा धुरळा उडत हो...

खरोखरच दुबईचे 'मिरॕकल' गार्डन..!

Image
        तब्बल ७२ हजार चौरस मीटर म्हणजेच जवळपास ७ लाख ८० हजार चौफूट बागेत १५० दशलक्ष फुलं आणि २५० दशलक्ष झाडं असलेलं जगातील सर्वात मोठं नैसर्गिक फुलांचे हे उद्यान दुबईचे अगदी खरोखरच 'मिरॕकल गार्डन' आहे.          एकीकडे वाळवंट, दुसरीकडे समुद्र आणि पाऊस-पाणी तर 'नाहीच' च्या बरोबर, अशा प्रतिकूल परिस्थितीत जगातील सर्वात मोठी बाग फुलवण्याचा चमत्कार करुन जगाला अचंबित केलं आहे. हिरव्याकंच उंचच-उंच वृक्ष राजीची विस्तीर्ण संरक्षण भिंत दिसू लागली, तसे उद्यानाजवळ आल्याचे पक्के झाले.        मिरॕकल गार्डनच्या प्रवेशद्वारावर बांबूपासून भल्या मोठ्या फुलदान्या बनवून त्यामध्ये रंग-बेरंगी फुलांचा ताटवा उभा केला आहे. जणू हा बाग पहायला येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी फुलांचा गुच्छ होय. आतमध्ये सुरुवातीलाच दोन्ही बाजूला दोन अश्वमुखाची भल्यामोठ्या प्रतिकृती हिरव्यागार वनस्पतींनी साकारली होती. त्या दोघांच्यामध्ये अगदी पुराण-पुरुष भासावा, अशा वटवृक्षाची कल्पक प्रतिकृती सिमेंटमध्ये बनवून त्यावर हिरव्या विविध झाडांची उगवण, ...

"आइए हुजूर..लिजिए खजूर..!"

Image
          घरी येणाऱ्यास चहा देवून आदरातिथ्य करणं हा जसा आपल्याकडील सर्रास पाहुणचाराचा प्रकार आहे, अगदी तसाच आखातातील बहुतेक देशांत घरी 'मजलीस' म्हणजे बैठक बसल्यानंतर  बिन साखरेचा चहा अर्थात 'गहवा' आणि सोबत मधूर 'खजूर' देण्याचा पाहुणचार आहे.             अगदी खजूर खरेदीसाठी बाजारात गेल्यानंतरही हव्या तेवढ्या प्रकारच्या खजूराचा स्वाद गहव्याच्या साक्षीने चाखायला मिळतो. अबुधाबीमधील ग्रँड मस्जिद पाहिल्यानंतर दुबईला परतताना खजूर बाजारात खरेदीसाठी आम्ही सर्व पर्यटक गेलो होतो. दुकानात प्रवेश करताच सुरुवातीलाच दुकानातील पोऱ्याने प्रत्येकाला खजूर चाॕकलेट देवून स्वागत केले. सौदी अरेबिया, दुबई, इराण अशा इतर देशांतील हर नमुन्याचे खजूर होते. लांबडे, बुटके, वाटोळे, गोलमटोल, सुरकुतलेले, तुकतुकीत कांतीचे पिवळे जर्द कच्चे असे हर एक नमुन्याचे प्रकार प्रथमच सर्वजण पहात होते. प्रत्येकाचा एक वेगळा असा स्वाद होता. त्याच्यापासून आणि इतर ड्राय फ्रूटपासून बनवलेले रंगी-बेरंगी आणि विविधढंगी स्वादिष्ट चाॕकलेटसही होती. हे घेवू की ते ...

आख्ख्या जगाला एका गावात बंदिस्त करणारं 'ग्लोबल व्हिलेज'

Image
 सगळ्या जगाला एका गावात बंदिस्त करण्याचा यशस्वी घाट घातला तो दुबईनेच.! आपल्याकडील असणाऱ्या  लाखो चौरसमीटर रिकामी-मोकळ्या जागेचा विनियोग उत्पन्नाच्या दृष्टीने करत आख्ख्या जगाला एका गावाच्या रुपात उभं केलं ते 'ग्लोबल व्हिलेज' च्या माध्यमातून.!          दुबईकडे असणारी रिकामी जागा उत्पन्नाच्या दृष्टीने खुणावू लागली. या जागेवर काय करता येईल, ज्या मधून देशाला उत्पन्न मिळेल शिवाय इथे येणाऱ्या पर्यटकांना एकाच जागी जग फिरल्याचा आनंद घेता येईल. त्यामधूनच सर्वोत्तम बाजारपेठ 'ग्लोबल व्हिलेज' ची संकल्पना पुढे आली आणि ती साकारली देखील गेली.          आपल्याकडे एखाद्या महोत्सवाच्या, जत्रेच्या निमित्तानं विविध प्रकारचे 'स्टाॕल्स' उभारले जातात, अगदी तशाच पद्धतीने परंतु, प्रत्येक देशाचा अती, अती विशाल स्टाॕल्स म्हणजेच एक स्वतंत्रपणे पॕव्हेलियन येथे उभारण्यात आले आहेत. शिवाय जत्रंत असणारे पाळणे-खेळणी अगदी फुगे विक्रेतेदेखील याठिकाणी आहेत. परंतु, हे सगळं आधुनिक यंत्रावर-तंत्रावर चालणारं आणि प्रचंड मोठ्या प्र...

जगाच्या इतिहासातील अनोखा अविष्कार 'पाम जुमेराह' अन् 'बुर्ज-अल-अरब'

Image
           दुबईबरोबर बुर्ज-खलिफाचे आपसूक नाव सध्या जोडले जात असले तरी, या पूर्वीच जगातील महागड्या हाॕटेलांमधील एक  'बुर्ज-अल-अरब' हाॕटेलमुळे दुबईची जगात आधीच ओळख बनलीय. जगातल्या अनेक  महागड्या शहरांपैकी एक शहर म्हणून दुबई चा उल्लेख होतो. तसेच जगातल्या अनेक उंची आणि महागड्या हाॕटेलपैकी एक हाॕटेल म्हणजे 'बुर्ज-अल-अरब' होय. 'अलिशान' हे विशेषणही त्याच्यासमोर 'टू स्टार' ठरावे, असे हे 'सप्त तारांकित हाॕटेल!               जहाजावरील शिडाच्या आकारातील हे हाॕटेल समुद्रात मानवनिर्मित जमिनीवर उभे राहिले आहे. आतील सजावटीत शुद्ध सोन्याचा अनेक ठिकाणी वापर करण्यात आला आहे. विमानतळावरुन 'रोल्स राईस' ने येणाऱ्या पर्यटकांसाठी असणाऱ्या सोयीबरोबरच थेट हेलिकाॕप्टरने आलेल्या पर्यटकांसाठी पाय उतार होण्यासाठी हाॕटेलच्या वरती खास हेलिपॕडची सुविधा केली आहे. प्रशस्त 'क्रीस्टल क्लिअर' समुद्र हे इथल्या समुद्राचे वैशिष्ट्यं म्हणावे लागेल. शांत, नितळ निळ्याशार समुद्राच्या प्ण्यात मासे दिसत होते. दुबईत जावून किमान य...

बुर्ज खलिफा अन् रंगारंग शो

Image
          दुबईचे नाव उच्चारताच त्या ओघानं चिकटतो तो अगदी अंतराळात शिरलेला बुर्ज खलिफा..! खरंतर या इमारतीमुळे दुबईला विश्व प्रसिद्धीबरोबर नवी ओळख मिळाली. त्याला साजेसा पायथ्याशी असणारा 'दुबई माॕल' आणि 'बेहद..तबियत खुश' करणारा तितक्याच ताकदीचा अरेबिक-हाॕलिवूड-बाॕलिवूड संगीतमय रंगीत कारंजा शो होय.        प्राणी संग्रहालयात प्रवेश करताच कूठूनही जिराफाची मान दिसावी, अगदी तसेच दुबईत प्रवेश केल्यानंतर चित्ताकर्षक मनोहारी उंचच-उंच 'इमारतगर्दीत' हा 'बुर्ज खलिफा' स्थितप्रज्ञेसारखा नजरेस पडून खुणावत असतो. अंतराळात जाण्यासाठी एखादी शिडी भासावी, असे त्याचे ते टोकदार निमुळते होत गेलेले शीर्ष पाहून वाटते. गंमत म्हणजे कुठेही फिरताना त्याचे दूरवरुन दर्शन हे ठरलेलेच.        या वास्तूला भेट देण्यापूर्वी पायथ्याशी विस्तारलेल्या देखण्या आणि कलाकृतीत अलिबाबाची गुहा असणाऱ्या दुबई माॕलला प्रथम भेट दिली. माॕलमध्ये प्रवेश करताच वातानुकुलित हवेचा हलका शिडकावा झाला. छतावरील आंतरिक नक्षिकाम लक्ष वेधून घेत होते. घरात असणारा फिश...