Posts

Showing posts from March, 2021

मासिक पाळीचा कप अर्थात पर्यावरणपूरक Wom Safe Mentrual Cup..

Image
      लहानपणी घरातील स्री बाहेरच्या खोलीत बसलेली आसायची. तिला देवाघरात, स्वयंपाक घरात येण्यास मज्जाव आसायचा. इतकेच काय तर चुकून सुध्दा तिला स्पर्श न करण्याची आम्हाला ज्येष्ठांकडून तंबी असायची. याबाबत अधिक विचारणा केल्यास, 'तिला कावळा शिवलाय' हे ऐकायला मिळायचं. थोडा कळता झाल्यावर 'शिवाशीव झालीय' असे शब्द कानावर यायचे.       ६५ व्या जाहिरातीच्या कलाविश्वात 'MC' अर्थात 'महिने का चक्कर' समजून आले. आतापर्यंत Stayfree, whisper बिनदिक्कतपणे जाहिरातीच्या माध्यमातून झळकून पुढे सरकत होते.       एकेकाळी घरातल्या स्री च्या होणाऱ्या व्यथेला जाहिरातीतून वाचा फूटली होती. Information, Education & communication यानेही जोर धरला होता. काळ बदलला. अक्षयचा 'पॕड मॕन' आला. साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात याच ' पॕडमॕन' ला आणून या विषयाला आधिक समाजाभिमुख करण्याचा एक सुंदर प्रयत्न झाला. या सामाजिक चळवळीत घरच्या  पुरुषालाही अधिक सजगतेने सहभागी होण्यासाठी प्रेरित केले गेले.         मासिक पाळीसाठी स...

"क्षणाची पत्नी अनंत काळाची माता तू..पुरूषप्रधान संस्कृतीत नुसतीच भारतमाता तू..!"

Image
      महिला दिनानिमित्त औद्योगिक न्यायालयातील महिलांचा सन्मान       क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला कार्याचा वसा आणि वारसा रस्त्यावरील दगड फोडणाऱ्या, ऊस भरून बैलगाडी हाकणाऱ्या महिलेपर्यंत पोहचवणं हे जास्त महत्त्वाचे आहे. आजही शिकलेली आमची सावित्रीची लेक व्रतवैकल्यं, उपास-तापास यातच अडकलेली दिसतेय. तीनं आता बदलायलाच हवं..सुरुवात करायलाच हवी. नव्या पिढीची, नव्या धैर्याची सावित्री बनायलाच हवी..           शनिवारी औद्योगिक न्यायालयाच्या न्यायाधीश समीना खान मॕडमचा फोन आला. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं न्यायालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहा म्हणून. खरंतरं महिलांच्या कार्यक्रमाला महिला व्याख्याती पाहुण्या बोलवाव्यात असं मी सुचवलं होतं. पण,  मॕडम तुम्हीच या आणि मार्गदर्शनही करा, असं त्या म्हणाल्या.      काय बोलायचं असा थोडा प्रश्न होताच. तयारी फारशी करताही आली नाही. आज तसा दिवसभर व्यस्तच होतो. सकाळी सौ. ला शुभेच्छ...