Posts

Showing posts from 2026

रंगरंगुल्या, सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला..!रत्नागिरीतील सड्यांवर रानफुलांचा रंगोत्सव..

Image
              हिरवी नाजुक रेशिम पाती,                दोन बाजूनी सळसळती                नीळ नीळुली एक पाकळी,                 पराग पिवळे झगमगती       कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेच्या या ओळी वाचताना डोळ्यांसमोर जो निसर्गाचा विलोभनीय कॅनव्हास उभा राहतो, तोच कॅनव्हास सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमधील सड्यांवर प्रत्यक्षात अवतरला आहे. पावसाच्या अधून-मधून बरसाणाऱ्या सरी ओसरल्यावर, इथल्या तांबड्या मातीच्या सड्यांनी जणू हिरवा शालू नेसला आहे. त्यावर विलोभनीय रानफुलांची रंगीबेरंगी 'वेलबुट्टी' साकारली आहे.       साताऱ्याचे 'कास पठार' आणि कोल्हापूरचे 'मसाई पठार' यांनी आजवर आपल्या रानफुलांच्या सौंदर्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे. पण, आता रत्नागिरी परिसरातील सडेही "आम्ही देखील पाठीमागे नाही, येवा आमचो सौंदर्य न्याहाळा!" अशी प्रेमळ साद पर्यटकांना घालत आहेत. साडवली, जैतापूर, देवाचे गोठणे, ना...

तोंग्बा: हिमालयाच्या कुशीतील उबदार आदरातिथ्य

Image
​        ​'जे होतं ते चांगल्यासाठीच!' या उक्तीचा प्रत्यय कधी, कुठे आणि कसा येईल, याचा नेम नसतो. एव्हरेस्ट ट्रेकचे प्रवेशद्वार असलेल्या 'लुकला'च्या भूमीवर आमच्या बाबतीत नेमके हेच घडले. खराब हवामानामुळे आम्ही लुकलामध्ये अडकून पडलो होतो. काठमांडूला जाण्यासाठी दुसरा पर्याय शोधत असताना, मनातील अस्वस्थता घालवण्यासाठी आम्ही स्थानिक बाजारपेठेत फेरफटका मारू लागलो. तिथेच आम्हाला तिथली लोकसंस्कृती आणि 'ड्युमजी' लोकोत्सव जवळून जाणून घेण्याची एक सुवर्णसंधी मिळाली.         त्या रात्री ​हॉटेलच्या बाहेर दोन स्थानिक तरुण शेर्पा आम्हाला पुढच्या प्रवासाचे मार्गदर्शन करत होते. बोलता बोलता माझे लक्ष त्यांच्या हातातील एका वैशिष्ट्यपूर्ण पात्राकडे गेले. लाकडाच्या एका देखण्या पात्रातून ते दोघे अतिशय तृप्ततेने काहीतरी पीत होते.      *कुतूहलाने मी विचारले, "हे काय आहे?" त्यांनी हसून उत्तर दिले, "ही आमची बिअर आहे. याला आम्ही 'तोंग्बा' म्हणतो!" ​         *पूर्व नेपाळ, सिक्कीम, दार्जीलिंग आणि भूतानमधी...

हिमालयाच्या कुशीत शेरपा संस्कृतीचा सोहळा 'ड्युमजी'

Image
          निसर्गाच्या लहरीपणामुळे लुकला विमानतळावर विमानांची उड्डाणे थबकली आणि आम्ही सक्तीच्या मुक्कामात अडकलो, हे खरं असलं तरी या 'वरुण कोंडी'ने आमच्यासाठी शेरपा संस्कृतीचे एक अद्भुत, आनोखे दालन खुले करुन दिले. निसर्गाची कवाडे बंद झाली तरी माणसांच्या आणि संस्कृतीच्या उत्साहाची कवाडे कशी खुली असतात, याचा प्रत्यय आम्हाला लुकलात आला. निमित्त होतं शेरपा समुदायाचा अत्यंत पवित्र आणि पारंपरिक 'ड्युमजी' उत्सव!     ज्या हाॕटेलमध्ये राहिलो होतो, त्याचे मालक अंग तेंग शेर्पा यांनी आम्हाला ड्युमजी उत्सव पहायला माॕनेस्ट्रीत घेवून गेले. तेथे आमचे स्वागत 'सूचिया' अर्थात चहा देवून केले. हा मीठ घालून केलेला चहा होता. बटर टी, शेर्पा टी, साॕल्टी असे चहाचे प्रकार असल्याचे समजले.                समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंचावर, उणे तापमानात राहणाऱ्या शेरपा लोकांचे जीवन जितके खडतर, तितकेच त्यांचे सण रंगीबेरंगी आणि ऊर्जेने भरलेले असतात. ड्युमजी हा केवळ एक सण नाही, तर तो या दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांच्या जिव्ह...

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग- १४ (शेवट) हिमशिखरांच्या सावलीतून मायभूमीच्या कुशीत

Image
        लुकला! एव्हरेस्टच्या कुशीत वसलेलं एक असं ठिकाण, जिथे निसर्ग प्रत्येक क्षणाला आपलं रूप बदलत असतो. बेस कॅम्पची यशस्वी मोहीम फत्ते करून जेव्हा आम्ही अत्यंत प्रसन्न मनाने लुकलात पाऊल ठेवलं, तेव्हा निसर्गानेही आपलं रंगरूप बदलायला सुरुवात केली होती. डोळ्यांदेखत आभाळ ढगाळून आलं, क्षणात धुक्याची पांढरी चादर सर्वत्र पसरली आणि बघता बघता पावसाच्या सरी कोसळू लागल्या.       बाहेर निसर्गाचं हे तांडव सुरू असतानाच, मुक्कामाच्या ठिकाणी आमच्यासाठी एक सुखद धक्का वाट पाहत होता. रात्रीच्या जेवणानंतर कस्तुरीने अचानक एक सुंदर केक आणून सर्वांना चकित केलं. शेखर, प्रशांत आणि योगेंद्र यांच्या साथीने तिने 'एव्हरेस्ट बेस कॅम्प'च्या यशस्वी पूर्ततेचा एक छोटेखानी पण, उबदार आनंदोत्सव आयोजित केला होता. आपल्याकडे पाहुण्यांचे स्वागत शाल देऊन करण्याची संस्कृती आहे, तर या दुर्गम हिमालयाच्या कुशीत 'खाता' देऊन सन्मान केला जातो. 'खाता' म्हणजे केवळ एक मुलायम वस्त्र नव्हे, तर तो जिव्हाळ्याचा, आदराचा एक रेशमी बंध असतो! येथील संस्कृतीत रंगांनाही निसर्गाचे अधिष्ठान ...

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग-13 श्वासांचा संघर्ष ते विजयाचा जल्लोष ; एव्हरेस्ट बेस कॅम्पवर तिरंगा

Image
   लोबुचेत पोहोचलो तेच मुळी डोकेदुखी घेवून ! दिवसभराची पायपीट, उन्हाचा तडाखा यामुळे डोकेदुखी असेल असे वाटत होते. परंतु, 'हाय अल्टीट्यूड'चे ते लक्षण होते. रात्रीदेखील ते जाम दुखत होते. मळमळ वाढली. उलटी होते की काय, असे वाटू लागले. ॲसिडीटी झाली असावी, असे वाटत राहिले. जेवणावरील वासना पूर्णपणे उडालेली होती. ही सर्व लक्षणे पाहून शेखरने लसूण सूप घेण्यास सांगितले. हाय अल्टीट्यूडची लक्षणं कमी करण्यासाठी गिर्यारोहक लसूणचा प्रभावी वापर करतात. याचा उल्लेख मागच्या भागात मी केलेला आहे. समोर लसूण सूप आलेले. ते बळे-बळेच पोटात गेले.    आधीच हे पिरॅमिड टी हाऊस म्हणजे एखाद्या 'भयपटा' तील वास्तूपेक्षा कमी नव्हते. त्यात, त्यामधील आजची रात्र ही सदैव लक्षात राहणारी, खडतर आणि भीतीदायक रात्रींपैकी एक ठरलेली.  पाठीवर आडवे होत झोपण्याचा प्रयत्न करताच उर प्रचंड धडधडत होते. श्वासांची कोंडी व्हायची.  मध्येच श्वासोच्छवास कमालीचा वाढायचा. Spo2 तपासले असता ते 70 पर्यंत दाखवत होते. सौ चे तर 40 दाखवू लागलेले. आडवे होवून झोपण्याचा केविलवाणा प्रयत्न सोडून दिला. भि...

स्वप्नापलीकडची एव्हरेस्ट वारी भाग - १२ क्षितिजापलीकडच्या संघर्षाची स्मारकं

Image
    ​ जसजसे आम्ही उंची गाठत होतो, तसतसा या हिमालयाचा राकट आणि खडतर चेहरा अधिकच तीव्रतेने समोर येत होता. हवेतील प्राणवायू  हळूहळू कमी होत होता आणि प्रत्येक श्वासासाठी फुफ्फुसांना करावी लागणारी धडपड आता उघडपणे जाणवू लागली होती. शरीरातील या बदलांचा थेट परिणाम भूक आणि झोपेवर झाला होता.      ​येथील 'टी-हाउस' संस्कृती मात्र, कमालीची आदरातिथ्य करणारी होती. रात्री जेवणापूर्वी हातावर मिळणारे वाफवलेले गरम रुमाल गोठवणाऱ्या थंडीत शरीराला सुखावणारी ऊब देऊन जायचे. जेवण जात नव्हते, त्यामुळे पोट भरण्यासाठी आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी आम्ही मुख्यत्वे 'सूप' पिण्यावरच भर दिला होता.       रात्री 'करा ओके'च्या माध्यमातून गाण्याची मैफील रंगली. बाहेर जसजसा थंडीचा पारा घसरत होता, तसतसा आतमध्ये अनेकांचा गळा गाण्यांच्या सुरांनी ऊबदार होत होता. थंडीला विसरण्यासाठी सुरांची ही ऊब मोठी सोबती ठरली.       ​त्या रात्री डोळ्याला डोळा लागलाच नाही. पहाटेच्या सुमारास कुठेतरी 'निशा'राणीने कवेत घेतले खरे ! पण, काही वेळातच दमगिरल्यासारखे झाल...

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग -11 तेंगबोचे ते दिंगबोचे.. रोमहर्षक प्रवास!

Image
     ​तेंगबोचेमध्ये पाऊल ठेवताच, सर्वप्रथम टी-हाऊस गाठून सामान ठेवले, फ्रेश झालो आणि लगेचच तेंगबोचे मॉनेस्ट्रीकडे निघालो.​समुद्रसपाटीपासून तब्बल 3,867 मी उंचीवर, सोलुखुंबू जिल्ह्यातील खुम्बू प्रदेशात ही मॉनेस्ट्री दिमाखात उभी आहे. दूधकोसी आणि इमजा खोला नद्यांच्या संगमावरील एका टेकडीवर वसलेल्या या मॉनेस्ट्रीला ‘गेटवे टू एव्हरेस्ट’ असेही म्हटले जाते. ​      मुख्य प्रवेशद्वार अत्यंत रंगीबेरंगी आणि तिबेटी कलाकुसरीने नटलेले आहे. प्रवेशद्वाराच्या अगदी वर, मध्यभागी असलेले 'धर्मचक्र' आणि त्याच्या दोन्ही बाजूंना बसलेली दोन हरणे भगवान बुद्धांनी सारनाथ येथे दिलेल्या पहिल्या उपदेशाची-धम्मचक्र प्रवर्तन आठवण करून देतात. ​     मॉनेस्ट्रीच्या गर्भगृहात अतिशय सुंदर, देखणी आणि भारदस्त अशी बुद्धांची सोनेरी मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडते. आतील भिंतींवर कोरलेली अप्रतिम चित्रे पाहत आम्ही तिथे काही वेळ ध्यानस्थ बसलो. शांतता आणि ऊर्जेचा तो अनुभव शब्दातीत होता.       ​आम्ही ज्या टी-हाऊसमध्ये मुक्कामाला होतो, त्याचे मालक होते अंग र...