Posts

Showing posts from January, 2025

मोडीत निघालेल्या "मोडी"ची वाढतेय गोडी..!

Image
  * बाराव्या शतकापासून सुरू झालेली राज दरबारातील मोडी लिपी १९६० नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली. परंतु, याच मोडीची गोडी पुन्हा एकदा वाढत आहे. येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने २० ते २९ जानेवारी या कालावधीत प्रथमच घेतलेल्या मोडी प्रशिक्षणात ८८ जणांनी सहभाग नोंदवून पूर्ण केले आहे.*     महाराष्ट्रात सुमारे 12 व्या शतकापासून मोडी लिपीची सुरूवात झाली असे इतिहासकारांचे मत आहे. श्री. हेमाद्रीपंत ते या लिपीचे जनक होते. न मोडता, न थांबता अत्यंत जलद गतीने लफ्फेदारपणे झरझर लिहिल्या जाणाऱ्या लिपीस मोडी असे म्हणतात. यादव काळापासून सुरू झालेला हा प्रवास शिवकाळात बहरला होता. या लिपीचा सर्रास वापर राजदरबाराबरोबरच लोकांच्या दैनंदिन जीवनात 20 व्या शतकाच्या अखेरपर्यंत होत असे. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेत 1960 पर्यंत तिचा समावेश शिक्षणात होता. परंतु, छपाईच्या दृष्टिने तिची मर्यादा लक्षात घेवून काळाच्या ओघात ही मोडी लिपी मोडीत निघाली.   मोडी लिपीचा प्रसार आणि प्रचार शिवकाळात झाला. शिवकाळ किंवा पेशवाई काळामध्ये ज्यांचे अक्षर...