Posts

Showing posts from 2013

लहान आकारातील आणि शाडूच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करावी - डॉ. रामास्वामी एन.

Image
सातारा , दि. 22   ( जिमाका)   :-    जलस्त्रोत नष्ट होऊ नयेत , तसेच जलप्रदूषण   होणार नाही यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी   लहान आकारातील , पर्यावरणपूरक रंगातील आणि शाडूच्याच गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करावी , असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी केले. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले , पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागने 3 मे 2011 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.   या निर्णयानुसार प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचा वापर करु नये यासाठी सर्वांनी जनजागरण करणे आवश्यक आहे.   पर्यावरणपूरक रंगातील आणि शाडू अथवा मातीच्या मूर्त्यांचा वापर करुन जलप्रदूषण टाळावे. बाजारातील उपलब्ध रंगाची चाचणी घेऊन पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करुन देण्याविषयीच्या सूचना संबंधितांना देऊन जिल्हाधिकारी पुढे म्हणाले , नगरपालिकांनी , ग्रामपंचायतींनी आपल्या स्तरावर बैठका घेऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रबोध...