केवळ..विस्मयकारक. विलोभनीय. श्री महाकालेश्वर काॕरीडाॕर
एकमेव दक्षिणमुखी असणारे अन् बारा जोतिर्लिंगांमधील एक असे उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिर ! ११ आॕक्टोबर रोजी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७५० कोटी खर्चून ९२० मीटर लांब असलेल्या 'काॕरीडाॕर' च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. पाहताचक्षणी 'केवळ..विस्मयकारक' उद्गार निघावेत असे हे विलोभनीय काॕरीडाॕर लवकरच जागतिक स्तरावरील पर्यटन स्थळ बनेल यात शंका नाही..! सौ च्या इंदोर येथील नोकरीच्या निमित्तानं गेल्या दीड वर्षात इंदोरला वरचेवर जाणं झालं. येथूनच अवघ्या अर्धा-पाऊणतासाच्या अंतरावर असणाऱ्या 'सम्राट विक्रमादित्या'ची राजधानी असणाऱ्या उज्जैनलाही या निमित्तानं प्रत्येक वेळी जाणं झालं ते श्री महाकालेश्वर दर्शनासाठी ! उज्जयनी ही एक ऐतिहासिक, पौराणिक आणि अतिप्राचीन नगरी आहे. क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेल्या या उज्जयनीचे आज उज्जैन नामकरण झाले. भगवज्जिनसेनाचार्य कृत 'आदिपुराण' मध्ये भगवान ऋषभदेव यांनी भारताला ५२ जनपदांमध्ये अर्थातच जिल्ह्यात विभाजित केले होते. त्यामध्ये 'अवंती' हा ए...