Posts

Showing posts from June, 2023

खतरनाक मार्गाचा सुखद शेवट गुलमर्ग

Image
                     काश्मिर सफर भाग-१२                   प्रसन्न वातावरणात पुन्हा एकदा टपोऱ्या लालभडक गुलाबांच्या ताटव्यासोबत श्रीनगरच्या आठवणी सोबत घेवून गुलमर्गकडे जाण्यासाठी निघालो. आज वाहनांची वर्दळ जास्त दिसत होती. विशेषतः पर्यटकांची वाहने! कदाचित त्यामुळे प्रत्येक चौकात सीआरपीएफ जवानांसोबत वाहतूक पोलीसदेखील दिसत होते. स्थानिक पोलीस वाहनांची तपासणी करत होते. बऱ्याच  ठिकाणी सीआरपीएफ आणि पोलीसांची वाहनेही लावलेली होती. बहुतेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु होती.           एके ठिकाणी मुख्य महामार्गावरुन गुलमर्गकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनाने धाव घेतली. हा चढणाचा आणि वळणा-वळणाचा रस्ता होता. हवेतील गारवा, दोन्ही बाजूला असणारी उंचच उंच देवदारची राई, त्यामधून दिसणारे पांढरे निळे आकाश, सोबत पर्वत राजीमध्येच खोल गडप होणाऱ्या दऱ्या हे सगळं आल्हाददायक आणि भारुन टाकणारं असं होतं.          बारामुल्ला जिल्ह्यातील ग...

हाऊसबोटीवरील मुक्काम..

Image
              काश्मिर सफर भाग -११                   कपडे भिजलेल्या अन् कुडकुडणाऱ्या अवस्थेत स्वतःला वाळवत सोनमर्ग ते श्रीनगर प्रवास उभा राहून केला. पण, झीपलाईन क्राॕसिंग आणि रिव्हर राफ्टींगच्या सुखावून देणाऱ्या आनंदात ते भिजणे अन् कुडकुडणे आता हरवत होते. अत्यंत वर्दळीच्या अणि वाहतूक कोंडीतून वाहन अक्षरशः दामटत श्रीनगरला हाॕटेलवर पोहचलो.         आजच्या रात्रीचा पडाव हाऊसबोटीत असल्याने जेवणानंतर आवश्यक साहित्यासह दल लेकच्या काठी रात्री आलो. निरव शांतता पसरलेली. काळा कभिन्न अंधार. मधूनच आलेल्या वाहनांच्या दिव्यांचा झोत पडायचा. त्यात दल लेकचे झोपलेले पाणी कुस बदलताना दिसायचे. पाण कोंबड्यांची खुसपूस, कुठेतरी मास्यांच्या उसळीने झोपेतील दल लेकचे पाणी चुबुक आवाजाने घोरत होते. हाऊसबोटीमधील दिवे दूरवरुन चांदण्याप्रमाणे भासत होते.          हा सर्व नजारा निरव शांततेत टिपत असतानाच, पाण्याला खच्चून जागे करत दोन शिकारे आम्हाला हाऊसबोटीवर घेवून जाण्यासाठी येत हो...

ज्येष्ठांची प्रेरणादायी तरुणाई..

Image
काश्मिर सफर भाग- १०                   मातकट बर्फातील उत्कटता संपल्यानंतर माघारी जात असताना, वाटेत झोझीला टनेलच्या कामाजवळ झालेल्या हानीची माहिती चालकाने दिली. एक खूप मोठी बर्फाची दरड कोसळल्याने वाहने, साहित्य यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याच्या खाणाखुणा मोडतोड झालेल्या वाहनांवरुन आणि साधनसंपत्तीवरुन दिसत होत्या. बर्फाची दरड कमालीची मोठी असणार, हे समोरील दृश्य पाहून जाणवत होते.        एव्हाना एका पाॕईंटजवळ आमचे वाहन पोहचले होते. रस्त्याच्या उजवीकडे पाण्याचा प्रवाह वाहात होता. बाजूच्या टेकडीवर लाॕन लावल्याने बगिच्याचा फिल निर्माण केला होता. एक छोटासा परंतु, लक्षवेधी प्रपात खाली येत प्रवाहात एकरुप होत होता. उंच पर्वत, त्याच्या टोकावर अगदी आकाशात पांढुरका बर्फ माखलेला दिसत होता. खरंतर हा फोटो पाॕईंट होता. अनेक पर्यटक उतरुन फोटोसेशन करत होते. आमच्यापैकी सर्वांनी त्याचा केवळ दूरुनच आस्वाद घेतला.       थांबलेली गाडी पुन्हा निघाली. जाताना, 'आते वक्त करेंगे..' असे आश्वासन दिलेल्या जागी ...

सोनमर्ग

Image
काश्मिर सफर भाग-९     सिंध तथा सिंधूनदीच्या खळाळत्या थंडगार पाण्याच्या नजाकतीच्या आठवणी टिपत तेथून मार्गस्थ झालो.  ती तशीच तिच्या मार्गाने वाटेतील दगड-गोट्यांना आणखी गुळगुळीत करत पुढे चालली होती. आम्हीही तिच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने परंतु, तिच्याच समांतर रस्त्यावरुन पुढे सोनमर्गकडे निघालो. वाटेत अगदी सौंदर्याची झालेली उधळण पहात, टिपत..!          लेह-लदाखकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची विशेष करुन ट्रक, अवजड वाहनांची बरीच कोंडी झालेली. ही सर्व वाहने मुंग्यांप्रमाणे एका ओळीने जागेवरच थांबून होती. वाटेत झोझीला टनेलचे मोठे काम सुरु आहे. काही ठिकाणी रस्त्याचीही मोठी कामे सुरु आहेत. त्यासाठी साहित्य घेवून आलेली अवजड वाहने, इंधनाचे टँकर्सची संख्यादेखील मोठी होती. अशा कोंडीत मार्ग काढत अंकीतभैय्याने  आमची मेटॕडोर पुढे रेटत,रेटत आणलेली.       सोनमर्गच्या प्रवेशद्वारावर पोहचलो होतो. येथे आपले वाहन ठेवून स्थानिक वाहनाने पुढील पाॕईंटसाठी जावे लागणार होते. खाली उतरलो तसा हवेत कमालीचा गारवा जाणवत होता. बर्फात जाण्य...

हिंद देश के निवासी..

Image
काश्मिर सफर भाग - ८           सकाळी लवकरच सोनमर्गला बर्फात निघायचय..ही सूचना ऐकतच आम्ही शिकारा सोडून हाॕटेलवर पोहचलो. खरंतर सोनमर्गला आॕक्टोबर २०१७ मध्ये बर्फाचे दर्शन झाले नव्हते. हा भूभाग चंद्रावर असल्यासारखा त्यावेळी भासला होता. पण, सकाळी बर्फात जायला मिळणार..ही सूचनाच आनंदाचा गारवा देवून गेली. कारण, या ठिकाणी बर्फ असल्याची पुष्टी स्थानिक नागरिक तसेच परतलेल्या इतर पर्यटकांकडून खात्रीशीर मिळाली होती.      हाॕटेलवर पोहचून फ्रेश झालो. जेवणासाठी वेळ असल्याने स्थानिक बाजारपेठेत फेरफटका मारायला पुन्हा निघालो. चिनार वृक्षाविषयी इथल्या नागरिकांची खूप वेगळी भावना असून, या झाडाखाली मनोभावे ईच्छा व्यक्त करतात आणि अशी ही व्यक्त केलेली ईच्छा पूर्ण होते, अशी माहिती समजली. खरं-खोटं माहीत नाही. पण, श्रध्दाळूंची उपस्थिती या वृक्षाखालून हटेनाच. क्षणात त्या डेरेदार वृक्षाला आपल्याकडील वटवृक्षाचे श्रध्दास्थान प्राप्त झाले. त्याच्याखाली अनेक ईच्छा व्यक्त होवू लागल्या. त्याच्या कोणत्या कानांनी त्याने किती ऐकले की नाही हे माहीत नाही. मुळात मराठीतील ई...