Posts

Showing posts from April, 2021

चंद्रामतात्या

"मुलगी पसंत हाय न्हवं.. तुमास्नी.." "व्हय तर.. हे काय इचारनं झालं व्हय.." "झालं तर मग.. आता जरा देण्या-घेण्याचं बोलू.." "देण्या-घेण्याचं आनी काय त्यात?" "तसं न्हवं.. रित-भात हायच की.. ती सोडून चालत्या व्हय.."  "आरं ए मर्दानू.. का उगीच वात्या कुटाय लागलाय? पाव्हणं तुम्ही तुमचा मुलगा सजवा, आणि पाव्हणं तुम्ही  तुमची मुलगी ! झालं न्हवं मनासारखं.. चला, आता घ्या साखर आनी करा एकमेकांचं त्वांड गोड" चंद्रामतात्यानं शेवटी अधिकारवाणीनं तोडगा काढला. गेले चार तास चाललेल्या चर्चेवर हुकमी तोड निघाली होती. वायफळ बडबडून हातघाईवर येणारं प्रकरण क्षणार्धात शांत झालं होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलेलं दिसत होतं. फिसकटणारी बोलणीच नाही, तर दोन कुटुंबं, दोन मनं आणि नवी सोयरिक चंद्रामतात्याच्या मध्यम मार्गानं जोडली गेली होती. साखरपुडा संपन्न झाला. इकडं मुठी भरभरून साखर एकमेकांच्या तोंडात घालत, पाहुणे मंडळी खिदळत होती. तर तिकडं आतमध्ये आता बायकांची एकच धांदल उडाली होती. उपवधुला हळदी-कुंकू लावून तोंडात साखर घालणारे मघाचे  हात, आता पदर खोचत स्वयं...

लाॕकडाऊनमधील "कथाविष्कार..!"

Image
अदृश्य विषाणूच्या वावराने दृष्य स्वरूपातील मानवी  हालचालींवर अनेक बंधने आली. पृथ्वीवरील विशाल देशासुध्दा ‘लॉक’ झाले. विविध दैनंदिन व्यवहार ‘डाऊन’ झाले. याकाळात घरकोंबडा बनलेल्या माणसाने मग  ‘तू नळी’ला हात घातला. अर्थात यू-ट्यूबच्या माध्यमातून नव्या प्रयोगांचा अविष्कार घराघरात करू लागला. नव-नव्या समाज माध्यमांच्या जंजाळात लिखित वाचन चळवळ हरवली.  हा आरोप खोडून काढण्यासाठी याच समाज माध्यमाचा वापर करत, ‘सर्वस्पर्शी प्रतिभांचा कथाविष्कार’ हा प्रातिनिधिक कथासंग्रह छापून तयार झाला. अर्थात हे घडलं ते ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांच्यामुळे..! लॉकडाऊनच्या काळात व्हॉटस्ॲप गटाच्या माध्यमातून वाचन आणि वाचक चळवळ सर्वदूर करण्यासाठी श्री. पोतदार सरांनी पुढाकार घेतला. या गटामध्ये दिग्गज साहित्यिकांसोबतच माझ्यासारख्या नव लेखकालाही प्राधान्य मिळाले. या  गटावर दररोज एका लेखकाची कसदार कथा पोतदार सर पाठवत असत. ती पाठवताना कथेसोबत लेखकाचा परिचय आणि कथेमागील बीज याचाही आवर्जून समावेश असायचा. या कथेवर पुढे आठवडाभर चर्चा व्हायची. एका लेखकाच्या लेखनावर कसलेल्या साहित्यिक सदस्यांकडून...

कलाकुसरीची कल्पना उतरवणारी चित्रकार डॉ. अल्पना

Image
‘ती’ वैद्यकीय क्षेत्रात व्यस्त असूनही आपल्या भन्नाट कल्पनांना विविध माध्यमातून वाट मोकळी करुन देते. कधी विविध रंगांची उधळण करत तर कधी पावडर शेडींगमधून हुबेहूब व्यक्तीचित्र साकारते. कॅनव्हॉसवर ॲक्रेलिक रंगांमधून, जलरंगांमधून निसर्गचित्र काढते. कागदाच्या लगद्यांमधून  साक्षात पांडुरंगांला आकार देते. मातीच्या भाड्यांना रंगछटांमधून सजीवपणा आणते.  विणकाम, नक्षीकाम, कलाकुसरीने कापडी पिशव्यांची नजाकत वाढवते. किचनगार्डनमध्ये वेस्टपासून बेस्ट बनवत बगीचा फुलवते. विविध कल्पना उतरवणारी ‘ती’ चित्रकार डॉ. अल्पना चौगुले होय. डॉ. सोपान आणि डॉ. अल्पना चौगुले यांचे शाहूपुरी 5 व्या गल्लीत चौगुले रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या वर असणाऱ्या छोट्याशा घरात प्रवेश करतानाच आतमधील कलाकारांची जाणीव होते. डॉ. अल्पना या मूळच्या सातारच्या. कन्या शाळेत असताना चित्रकलेच्या दोन्ही परीक्षा दिल्या होत्या परंतु, प्रत्यक्षात मुलगा दहावीला गेल्यानंतर त्यांनी तसे पहिले चित्र रेखाटले. पावडर शेडींगमधील त्यांनी काढलेले सासऱ्यांचे हुबेहूब चित्र पाहून मुलांने आणि नंतर पती या दोघांनी खूप कौतुक केले ...