आजीची रानभाजी ; कंदमुळ रताळे
रताळे हे एक पौष्टिक कंदमूळ अहे. उपवासाच्या दिवसात विशेषतः महाशिवरात्रीच्या उपवासासाठी रताळे मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. गोड बटाटा (स्वीटपोटॅटो) म्हणून ओळखले जाणारे हे कंदमूळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उपवासाच्या काळात रताळ्याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा देण्याचे काम होते. आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे रताळे.. स्टार्चने परिपूर्ण असल्यामुळे रताळ्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. रताळ्यांमध्ये 'अ' आणि 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. विशेषतः केशरी रंगाच्या रताळ्याम...