Posts

Showing posts from May, 2024

कासव..एक 'संघर्षयात्री'..!

Image
        दापोली वन परिक्षेत्रामध्ये दापोली, मंडणगड, व खेड तालुक्यांचा सामावेश आहे. या वनपरिक्षेत्रात कासव संवर्धन व संरक्षणाचे काम करण्यात येत असून, 2011 पासून ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवाच्या 55 हजार 916 संघर्षयात्री कासव पिल्लांनी स्वतंत्र जीवनासाठी समुद्राकडे धाव घेतली आहे.             महर्षी दुर्वासा ऋषींनी इंद्र देवाला दिलेल्या शापापासून सुरुवात झालेल्या पद्मपुराणातील कथेची, भगवान विष्णूच्या कुर्मावताराने समाप्ती झाल्याचे दिसून येते.           अमृतासह तेरा अमुल्य रत्नप्राप्तीसाठी रवीरुपी मंदार पर्वत, वासुकी नागरुपी दोरीने समुद्र मंथन करताना मंदार पर्वत समुद्रात खचू लागला. त्यावेळी भगवान श्री विष्णूंनी कुर्मावतार घेवून, हा पर्वत आपल्या पाठीवर घेतला, अशी अख्यायिका सांगितली जाते. या ठिकाणी कासवाच्या टणक पाठीचे महत्व अधोरेखित होते. याच पाठीचा ढालींसाठी उपयोग व्हायचा.       कासव हा पृष्ठवंशीय आणि समषितोष्ण कटीबंधात राहणारा प्राणी आहे. कासवाच्या सुमारे 220 प्रजाती असून, ...

मुग्यांचं घरटं..!

Image
      शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना..! 'घरटं' हे खास करुन पक्ष्यांसाठी वापरलं जातं. निसर्ग कवयित्री बहिणाबाईंची 'खोपा' ही त्यासाठी सर्वश्रुत आहे. मुंग्यांच्या घराला 'वारुळ' म्हणतात. बालपणापासून ते पहातही आलोय. या वारुळात साप अतिक्रमण करतो. म्हणून तर, 'आयत्या बिळात नागोबा' ही म्हण देखील रुढ झाली.         होय, मुंग्यांचं जसं वारुळ असते, तसेच त्यांचे झाडावर खास करुन आंब्याच्या झाडावर मानवी डोक्याच्या आकाराएवढे वाऱ्यावर झुलणारे घरटं असते. हे देखील आपण कदाचित पाहिले असेल. परंतु, याच्या निर्मितीविषयी फार कमी माहिती घेतली असावी.         लाल आणि काळ्या अशा प्रमुख दोन मुख्य मुंग्यांचे प्रकार सर्वत्र दिसतात. सूक्ष्म, मध्यम आणि मोठ्या हे आकारावरुन पडलेले प्रकार आहेत. काळ्या निरुपद्रवी तर, लाल, चावून चावून हैराण करुन सोडणाऱ्या. मग त्या आकाराने कोणत्याही असोत. पंख फुटून उडणाऱ्या मुंग्यांची जमात देखील विशिष्ट काळात दिसते.      मुंग्या जमिनीखाली आणि वर वसाहत निर्माण करतात. त्यांना वारुळे म्हणतात. शेतात, जं...