Posts

Showing posts from May, 2023

शिकारा पर्यटन

Image
काश्मिर सफर भाग-७               भारताचे सौंदर्य काश्मिर..काश्मिरचे सौंदर्य दल सरोवर..अन् त्याचे सौंदर्य शिकाऱ्यातील मारलेला फेरफटका आणि हाऊसबोटमधील राहणं होय. अशा शिकारामधून विस्तीर्ण, शांत पसरलेल्या दल सरोवरातून फेर-फटका मारणे ही वेगळीच अनुभूती आहे.        दल सरोवर हा श्रीनगरचा दागिना समजला जातो. बऱ्याच ठिकाणच्या पर्यटनात आजवर विविध जलाशयात बोटींगचा अनुभव घेतला आहे. पण दल सरोवरातील शिकारामधून  फेर-फटक्याची अजिबात सर त्याला नाही. जुन्या चित्रपटात विशेषतः शम्मी कपूरच्या 'कश्मिर की कली' मधून या शिकाऱ्याचे चित्रिकरण पाहताना, कधीतरी याचा आनंद आपणही घेवू, असे त्यावेळी तरी कधी वाटले नव्हते.           पाईन-देवदार या वृक्षांचा वापर कशासाठी केला जातो, याबाबत शालेय भूगोलाच्या पुस्तकात आजवर केवळ वाचून होतो. इथे साक्षात त्याचा वापर पाहून त्याचाही वापर करत होतो. दल सरोवरामध्ये फिरण्यासाठी शिकाऱ्याची खास सोय आहे.  सुंदर आकर्षक रंगातील आणि सजवलेले शिकारा घेवून सरोवराच्या काठावर शेकडो श...

मुँह ए मुक्कदस..हजरत बल दर्गा

Image
काश्मिर सफर भाग-६          झेलम नदीच्या काठावर वसलेल्या श्रीनगरचे सौंदर्य म्हणजे विस्तीर्ण, शांत, निर्मळ पसरलेले दल सरोवर..! या दल सरोवराच्या काठावरच विविध बगिचे फुलले आहेत. एका बाजूला हिमालयीन पर्वत रांगा एका ओळीने उभ्या ठाकल्या आहेत, अगदी निश्चलपणे.  जणू शहराचा राखणदार असल्यासारख्या, अगदी पहारेकरीच म्हणाणा हवे तर.         मुघल गार्डनच्या समोर दल सरोवर आणि त्याच्या सरळ पुढे आकाशाला स्पर्श करणारे संगमरवरी मिनार आणि बाजूलाच पांढरा शुभ्र गोलाकार घुमट. पृथ्वीवर एखादा मोती ठेवल्यासारखे हे दृश्य दूरवरुन पाहणाऱ्याला वाटते. हाच तो हजरत बल दर्गा होय. बल म्हणजे जागा.         फारशी भाषेत केसाला मुँह ए मुक्कदस म्हटले जाते. हजरतांच्या दाढीचे केस अर्थात मुँह ए मुक्कदस या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. याच ठिकाणी पवित्र कुराणाची प्रत देखील पहायला मिळते. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने प्रार्थना अर्थात नमाज अदा केली जाते.         याचा थोडासा इतिहास पाहिल्यास सर्वप्रथम भारतात मुँह ए मुक्कदस विजापु...

कोकणचा मेवाच बनला करिअरचा ‘गोडवा’

Image
      खाद्य तंत्रज्ञ ते सरबत उत्पादक वाढत्या उन्हाळ्याच्या उष्म्यात थंडगार सरबताचा गोडवा मानवाला आल्हाददायक बनवतो. कोकणच्या निसर्गरम्य भूमीत पिकणाऱ्या रानमेव्याचा  नैसर्गिक गोडवा जर सरबतातून मिळाला तर...हाच विचार घेवून ‘द रियल टेस्ट ऑफ कोकण’ ही ओळख घेवून फूड टेक्निशीयन असणाऱ्या श्रीमती संगिता श्याम माळकर रा.वेतोरे ता.वेंगुर्ले यांनी ‘गोडवा’ या नावाने सरबत निर्मितीचा उद्योग सुरु केला आहे. श्रीमती माळकर या पूर्वी ठाण्यामध्ये राहत होत्या. त्यावेळी त्या इतर उत्पादनाच्या मार्केटींग करत होत्या. फूड टेक्नोलॉजिचा त्यांनी यामध्ये डिप्लोमाही केला आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या कोकणातील मूळ गावी येवून 2017 साली कुडाळ एम.आय.डी.सी मध्ये ‘वत्सला एंटरप्राईजेस’ नावाने सरबत निर्मितीचा प्रकल्प सुरु केला. भाऊ परेश वरवडेकर यांनी सद्यस्थितीत या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी ‘मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत’ चालू वर्षी 1 कोटी 7 लाख 50 हजार प्रकल्प खर्चाचा प्रस्ताव सादर केला. यासाठी त्यांना दोन हप्त्यांचे मिळून 20 लाख 40 हजार रुपयांचे अनुदान  मंज...

ए देख के दिल झुमा..

Image
 काश्मिर सफर भाग -५           'ए तो कश्मिर है..इसकी फिजा का क्या कहना..'याचा प्रत्यय खरंतर श्रीनगरकडे येतानाच जागोजागी प्रवासात येत होता. आज सकाळपासून तर त्यात आणखीनच भर पडत होती. निसर्गसंपन्नता त्याची नजाकत हे अनुभवत होतो.         जम्मू आणि काश्मिर शासनाच्या फुलशेती विभागाच्या नेहरु स्मारक वनस्पती उद्यानात पोहचलो. या बगिचाला चष्माशाही असं आता म्हणतात. 'चश्मा ए शाही याचा तो अपभ्रंश आहे. ही छोटीशी बाग नेहरु मेमोरियल च्या वरच्या भागात आहे. आजू-बाजूच्या पहाडातून येणाऱ्या नितळ, मिनरल पाण्याच्या झऱ्यासाठी ही बाग प्रसिद्ध आहे.     दल सरोवराच्या समोरच असणाऱ्या या बागेत एक छोटा तलाव आहे. त्यामध्ये उडणारे कारंजे पर्यटकांना आकर्षित करत होते. बागेतील विविध रंगी-बेरंगी फुले मधमाशांसह पर्यटकांना मोहीत करत होती. कुठे आणि किती फोटू घेवू..असं साऱ्यांना होत होतं, हपापल्यासारखे छान-छान छबी टिपण्यात सर्वजण व्यस्त होते.      टुलीपच्या फुलांचा विभाग सध्या बंद होता. परंतु, त्या वर्गातील पिवळ्या रं...

करिअरला लसणाची फोडणी..!

Image
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून लसूण सोलून देण्याचा उद्योग स्वयंपाक घरात स्वादिष्ट जेवणासाठी लसणाची फोडणी ही तृप्तीची ढेकर द्यायला भाग पाडते. परंतु, या लसूण पाकळ्या सोलून त्यावरील साल काढणे हे अत्यंत जिकिरीचे, कंटाळवाणे आणि वेळखाऊ काम असते. नेमके हेच हेरून यालाच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटाच्या प्रांजली प्रमोद सुभेदार यांनी करिअर बनवले आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून लसूण सोलून देणे, पेस्ट बनवून देण्याचा उद्योग त्यांनी सुरु केला आहे.  सावंतवाडी येथे तुळजाई एंटरप्राईजेस या नावाने लसूण प्रक्रिया उद्योग सुरु केला आहे. श्रीमती सुभेदार यांच्या पुतण्याचे हॉटेल होते. या हॉटेलसाठी त्यांना बाहेरुन लसूण आणावा लागत असे आणि अगदी तोही सोलण्यासाठी पैसे द्यावे लागायचे. याच वेळी हाच उद्योग आपण सुरु केला तर बचत गटातील महिलांनाही रोजगार मिळेल, शिवाय आपल्यालाही स्वयंरोजगार उपलब्ध होईल, ही संकल्पना त्यांच्या मनात चमकून गेली. गुजरात,मुंबई येथून उद्योगासाठी आवश्यक असणारे लसूण गड्डे मागवून ऑक्टोबर 2022 पासून त्यां...

श्रीनगरचे शंकराचार्य मंदिर

Image
काश्मिर सफर भाग-४         दिवसभर प्रवास करुन श्रीनगरला रात्री उशिरा पोहचलो. प्रत्येकजण प्रवासाने दमला होता. अशाही स्थितीत भारतीय तिरंग्यातील रस्त्यांवरील सार्वजनिक लाईटस्ने लक्ष वेधून घेतले. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने देशभर विविध सोहळे साजरे झालेले. काहिसा त्याचाच भाग म्हणून इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेने सार्वजनिक लावलेले दिवे विशेषतः ट्युब्ज या तिरंग्या मध्ये झगमगत होत्या.         काचेच्या तावदानातून अन् पडद्याच्या सांद्रीतून पहाटेची किरणावली बेडरुममध्ये शिरलीत तशी जाग आली. पडदे बाजूला सारुन गॕलरीतून सूर्यदर्शन घेतले. पाईन-देवदारच्या सोबतीने निळ्या आकाशाच्या गर्भातून तेजोमय गोळा डोंगराच्या आडून समोर येत होता. बालपणी रेखाटलेल्या सूर्योदयाची  वास्तवता अनुभवत होतो. या प्रभात दर्शनाची छबी टिपली. समोरील लाॕनमध्ये लाल भडक टपोरे गुलाब भरगच्च उमललेले पहायला मिळाले. आपल्याकडे ज्याप्रमाणे गेटवर बोगनवेल चढवलेली, फुललेली असते, तसे येथे लाल गुलाबांची फुले सर्वत्र गुच्छ स्वरुपात गेटच्या कमानीवर पहायला मिळालीत. ...

साद घालती हिमशिखरे

Image
काश्मिर सफर भाग-३              जम्मूमधील वाहनांची गर्दी, वाहतुकीची कोंडी आणि उष्म्याने काहिसे हैराण झालेले बर्फाच्या शोधात श्रीनगरकडे निघालो. अचानक वातावरणात बदल होवून ते ढगाळ बनले. पाऊस पडेल असे वाटले परंतु, ती हुलकावणी ठरली.         मार्गात बऱ्याच ठिकाणी अजूनही रस्त्याची, पुलाची आणि भोगद्याची कामे सुरु होती. त्यामुळे दुहेरी, तिहेरी प्रशस्त मोठे रस्ते बनूनही त्यावर वाहतुकीची कोंडी जागोजागी होत होती. यात माल वाहतूक करणारे ट्रक्स, टँकर यांचा भरणा मोठा होता. तशातच पर्यटकांचे टेंपो, चार चाकी वाहने ही मधूनच घुसून आणखी कोंडी वाढवत होती.         तावी,चिनाब, सतलज, झेलम नदीच्या काठा-काठाने वाहन पळत होते. काही ठिकाणी पात्रे मोठी असूनही, पाण्याचा प्रवाह कमी होता. दगड-गोट्यांवरुन वळसे घेत दुधाळ पाणी खळखळाट करत धावत होते. पाईन, देवदार, फर, चिनार अशी उंचच उंच वाढलेल्या वनराईचे डोंगर तर, खोलवर गडप होत जाणाऱ्या दऱ्या, अशा घाटीतून सुरुवातीचा दाटी-वाटीचा असला तरी तो सुखद प्रवास होता. मधूनच दूरवर पांढुरक्या ढगांमध्ये...

काली माता मंदिर

Image
काश्मिर सफर भाग-२            पुण्याहून आमच्या सफरीतील सहपर्यटकांसह अन्य प्रवास्यांना पोटात सामावून घेवून झेलम एक्सप्रेस जम्मू-तावी रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. तत्पूर्वी आम्हा पर्यटकांना पुढील मार्गक्रमणासाठी सरस्वती धामजवळ उभ्या ठाकलेल्या मेटॕडोरमध्ये मी आणि सौ. स्थानापन्न झालो होतो. काही वेळातच सारथी अंकीत आणि त्याचा सहकारी मुकेश यांनी सर्वांचे साहित्य टपावर ठेवले. पावसापासून सुरक्षित करण्यासाठी त्यावर प्लास्टिक कागद बांधला आणि पहिल्या पर्यटन स्थळाकडे आम्ही सार्वजण निघालो.        पर्यटकांमध्ये बहुतांशी ज्येष्ठ नागरिक होते. काहीजण सेवानिवृत्त तर काही निवृत्तीकडे आलेले. त्यातही महिलांची संख्या आघाडीवर, पुरुष केवळ चौघेजणच. अवघ्या साडेपाच किलोमीटरच्या प्रवासात सर्वांची आता ओळख झालेली. ज्येष्ठ सहपर्यटक आम्हा दोघांनाही प्रेरणादायी होते, हे ओघाने पुढे येईलच.          जम्मू-तावी रेल्वे स्टेशनपासून साडेपाच किलोमीटर अंतरावर काली माता मंदिर होते. खरंतर तो एक बहू नावाचा प्राचिन किल्ला होता. राजा बहू लोचन यांने ता...

निर्भय नंदनवनाकडे..

Image
काश्मिर सफर भाग-१                काश्मिरला भारताचे नंदनवन, स्वर्ग, स्वित्झर्लँड आणखी बरीच विशेषणे वापरली जातात. ही विशेषणे ज्या वैविध्यपूर्ण नैसर्गिक, प्राकृतिक वा प्रादेशिक सौंदर्यावर अवलंबून आहेता, ती आणि तेथील निसर्ग संपन्नता ही प्रत्येक महिन्यात वेग-वेगळी असते. ही नजाकत अनुभवण्यासाठी वेगवेगळ्या ऋतूत किमान ४ वेळा तरी पर्यटनाला काश्मिरला जायलाच हवं.       आॕक्टोबर २०१७ नंतर पुन्हा नवा निसर्ग अन् त्याचे सौंदर्य अनुभवायला मी आणि सौ. इंदोरमधून निघालो. तब्बल पाच-साडेपाच वर्षानंतर या सफरीत निसर्ग आणि त्याचे रुप कसे पहायला मिळतेय..खरंतर ही एक उत्सुकताच होती.       मालवा एक्सप्रेसने इंदोर स्टेशन सोडलं तशी छोट्या-मोठ्या गावांची स्टेशन मागे पळू लागलीत. सकाळी सव्वा सातला पानिपत आलं. करनाल, कुरुक्षेत्र, अंबाला, लुधियाना अशी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि प्रसिद्ध गावं देखील सौ बरोबरील चर्चेच्या ओघात मागं पळाली.     नियोजित सफरीत आम्ही एक दिवस आधीच जम्मूत पोहचलो होतो. आमच्या भैरवी ग्रुपच्या...