माडगं..!
सिंधुदुर्गमध्ये आल्यापासून गेल्या चार महिन्यात नाश्त्याला बनवणाऱ्या पोहे, उप्पीट, मोड आणलेली कडधान्ये, उकडलेली अंडी या पदार्थात माडगं आणि भाताच्या पेजेने विशेष स्थान मिळविले आहे. खरं तर माडगं आणि कुळीथ अर्थात हुलगं यांचं विशेष नातं आहे. मी इथे नाश्त्याला नाचणी, बाजरीचं माडगं बनवतो. कारण, ते साहज उपलब्ध आहे. तापानं आजारी पडणाऱ्या व्यक्तीला हुलग्याच्या गोडसर माडग्यासारखं औषध नाही. माडग्याचं मूळ थेट माझ्या बालपणात रुजलेलं..! त्यानंतरच अर्ध्या आयुष्याच्या वाटेवर असताना आज त्याला नवी पालवी फूटतेय. जिभेवरुन उदरात उतरतंय..ते थेट बालपण घेवूनच..! राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जनक पित्याच्या नावे जयसिंगपूर ही व्यापारी नगरी वसवली. त्यासाठी खास कोल्हापुरातून व्यापारी निमंत्रित केले होते. शेंगा, सोयाबीन, गुळ, तंबाखू यांचे मोठे सौदे येथे चालायचे. तंबाखूचे माहेरघर म्हणूनही शहराची ओळख होती. पंचक्रोशीतून येथे धान्य येथील अडत दुकानांत यायचे. यात शेंगांबरोबर लालसर हुलगाही असायचा. हाच...