Posts

Showing posts from September, 2025

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

Image
तरुणांना प्रेरणा देणारी ७५ वर्षीय शेतकऱ्यांच्या श्रमाची 'नाचणी'       दुर्गम, डोंगर उतारावर, जेथे निराशा आपले तळ ठोकून बसते, तेथेच काही श्रमजीवी हात मातीशी बालपणापासून संवाद साधत आहेत. चिपळूण तालुक्यातील भैरवगडाच्या पायथ्याशी वसलेल्या तळवडे ग्रामपंचायतीमधील पाते या वाडीत दत्ताराम धामणकर (वय ७५), काशिराम निकम (वय ७५), आणि राजाराम धामणकर (वय ५५) या तिघांची कष्टमय गाथा केवळ शेती नाही, तर अखंड जिद्दीचा मंत्र आहे. काही शेतकरी जेव्हा "आमची शेती दुर्गम आहे, पडीक आहे, आता त्यात काही राहिलं नाही," अशी निराशेची भाषा बोलून दाखवतात, तेव्हा याच डोंगरउतारावरील या ज्येष्ठ शेतकऱ्यांचे श्रम विशेषतः युवा पिढीला एक तेजस्वी प्रेरणास्रोत ठरतात.       गावचे पोलीस पाटील बळीराम साळुंखे यांच्यासह या शेतीला प्रत्यक्ष भेट देवून त्यांच्या श्रमाची कहानी जाणून घेतली.                   श्रमाचा महामंत्र:      या तिन्ही शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे मातीचे अधिष्ठान आणि घामाचे तीर्थ आहे. ते दररोज या कठ...

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

Image
      कोकण! जिथे नारळी पोफळीच्या बागा, काजू आंबा फणसाच्या रांगा अशा रांगांमधून होणारे सूर्यास्त दर्शन मनाला भुरळ घालते. निळ्याशार समुद्र, हिरव्यागार डोंगररांगा अशा या सौंदर्याने नटलेल्या कोकणात ‘इथे काम मिळत नाही..काम करायला माणसे मिळत नाहीत’ असा सर्वसाधारण संवाद ऐकायला मिळतो. पण, ही नकारात्मकता झुगारुन याच मातीतल्या माणसांच्या मेहनतीवर गणपतीपुळ्याच्या भूमीत वैभव सरदेसाई यांनी पर्यटनस्थळ उभारणीबरोबरच स्थानिकांच्या हाताला एक नवी कला दिली आहे. स्थानिक माणसांच्या सोबतीने किंबहुना त्यांच्या मेहनतीवरच प्राचीन कोकण, मॅजिक गार्डन या प्रकल्पानंतर लाकडी खेळणी बनविणारा ‘मैत्रेयी हॅडीक्राफ्ट’ हा प्रकल्प सुरु केला आहे.    प्राचीन कोकण-गणपतीपुळे मंदिरापासून अवघ्या काही अंतरावर अवघ्या तीन एकर जागेत 500 वर्षापूर्वीचे कोकण कसे होते हे जिवंत केले आहे. अगदी सुरुवातीलाच गुहेच्या आतमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सध्याचा कालखंड आणि गुहेतून पुढे प्रवास केल्यानंतर जुने कोकण अनुभवायला मिळते. येथील झाडांची सवर्णन करणारी पाटी केवळ माहिती देत नाही, तर त्या झाडासोबतच्या ...