Posts

Showing posts from January, 2022

आईचा खजिना..!

Image
      हल्ली बऱ्याचवेळा सुट्टीला गावी म्हणजेच आईकडे जाणं होतंय. आईला भरपूर आनंद होतो. अगदी, मी वाटेत प्रवासात असतानाच, 'निघालास का? थेट घरी जेवायला ये..बाहेर मित्रांकडे थांबू नकोस..' अशी तिची सूचना ठरलेली असते. मी ही आपला सरळ घरीच पोहोचतो. ती माझ्यासाठी जेवायची थांबलेली असतेच. मी फ्रेश होईपर्यंत ती जेवण गरम करुन ताट वाढून पुढ्यात ठेवते.        माझ्या सगळ्या आवडी निवडी अजूनही ती काल सांगितल्याप्रमाणे  जपत असते. सकाळी नाश्त्याला कधी ताक-कण्या करते, तर कधी दही धपाटे, तर कधी चोंगे ! दुपारच्या जेवणातही अंबील वा ताक, भाजी-भाकरी सायंकाळी मात्र, बढाखान्यात कधी खेकडे, मासे, तर कधी चिकन ! माझी तर दोन दिवस चंगळच असते. तिलाही हे सर्व या वयात करुन मला खाऊ घालताना मोठं समाधान मिळते. किंबहुना तिची हीच ऊर्जा असावी असे मला जाणवले.         मला कळू लागल्यापासून जुन्या घरात एक काळसर पत्र्याची ट्रंक होती. कालौघात तीचे अस्तित्व गायब झाल्यानंतर नव्या घरात तिच्या जागी लाल ट्रंक भिंतीतल्या कपाटात स्थानापन्न झाली. त्य...

जुगलबंदी..तिही खरतालची ढोलकशी..!

Image
           मी काही दिवस राजस्थानच्या दौऱ्यावर होतो. जेव्हा परत आलो, त्यावेळी राजस्थानहून काय आणलं? हा पहिला प्रश्न मित्रमंडळींनी सहजतेने विचारला. तेथे काय पाहिलं? हा दुसरा प्रश्न सुलभतेने विचारला. मानवी स्थायीभावाप्रमाणे हे दोन्ही प्रश्न स्वाभाविक आणि अपेक्षितच आहेत.         या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देताना मी म्हणालो, तेथे कला, पाहिली, कलाकार पाहिले, किल्ले-राजवाड्यांचे वैभव पाहिलं आणि जैसलमेरमधील अप्रतिम असे सौंदर्य पाहिले. तसं म्हटलं तर आज जगातील हव्या त्या गोष्टी आॕनलाईन मागवता येतात. पण मूळ राजस्थानी कलाकारीच्या त्यातही बिकानेरमधील 'राष्ट्रीय उंट संशोधन केंद्रा'मधून 'वाळवंटातील जहाज' असणाऱ्या,   उंटापासूनच्या काही भौतिक वस्तू सोडल्या, तर तेथील कलाकारांची समाधानी वृत्ती, पर्यटकांविषयी असणारी आदरातिथ्याची भावना, अद्भूत कलाकारी, 'वाळवंटासारख्या मरुभूमीतही 'समाधान..सुख..जीवन' याची हिरवळ शोधून जोपासणाऱ्या वृत्तीची ऊर्मी मी सोबत आणल्याचे आवर्जून सांगितले.           ...

गोटी सोडा..एक आठवण!

Image
      सायकलचे हँडल पकडून पॕडेल मारत सायकलच्याच दोन चाकांच्या सहाय्याने मागील लाकडी हौद्यात हिरव्या-शेवाळलेल्या डब घातलेल्या बाटल्या घेवून चौका-चौकातील दुकानांपर्यंत पोहचवणारा सोडेवाला संजू (आता आडनाव लक्षात नाही) त्यावेळी पहायला मिळायचा. या डब घातलेल्या बाटल्या म्हणजे "गोटी सोडा" असायचा. या बाटल्यातील 'माने'त विशिष्ट खोबणीची जागा खास गोटी बसण्यासाठी केलेली असायची. ही काचेची गोटी आतमध्ये कशी घालत असत? हा प्रश्न खूपवेळा मला पडायचा. सोड्याने भरलेल्या बाटलीचे तोंड आपसूकपणे ही गोटी बंद ठेवायची. सोडेवाला तिला प्रेशर करुन खाली ढकलताच प्रथम बाहेर येणारा सोडा 'मी येतोय रे..' हा संकेत देणारा आवाज काढायचा.  त्यानंतर विशिष्ट किणकिणणारा आवाज काढत गुपचूपपणे ही गोटी आपल्या खोबणीवजा गुहेत समाधीस्त होई. अन् बुडबुडे निर्माण करत फेसाळणारा सोडा मोठाल्या काचेच्या पेल्यात उतरत असे. पिणाऱ्याच्या पोटात शिरुन गडप होतानाच, पुन्हा उसळी घेत तृप्तीची ढेकर बाहेर काढी.         सुरुवातीला अपचन, गॕससारख्या पोटाच्या तक्रारींवर सुरु झालेली सोड्य...

"इथं मोठं होण्यासाठी मरावं लागतं" हे माईंचं वाक्य सर्वांचे मोबाईल "स्टेटस" पाहून आज प्रकर्षाने आठवलं..!

Image
"इथं मोठं होण्यासाठी मरावं लागतं" हे माईंचं वाक्य सर्वांचे मोबाईल "स्टेटस" पाहून आज प्रकर्षाने आठवलं..!      जयसिंगपुरात बुध्दविहारात झालेल्या धम्मपरिषदेला एकदा माई आल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे त्यावेळी प्रमुख पाहुणे होते. माईंचा त्यावेळी सत्कार करण्यात आला होता. निटस् आता आठवत नाही, कोणत्यातरी प्रश्नावर माई मुख्यमंत्र्यांना  निवेदन देवून आपली आग्रही भूमिका व्यासपिठावर त्यांच्याशी चर्चा करताना मांडत होत्या.       लक्ष्मीकांत ऊर्फ बंडा मिणीयार यांनी दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंचच्या माध्यमातून जयसिंगपुरात माईंना "समाजभूषण" पुरस्कार दिला होता. यावेळी कादंबरीकार बाबा कदम, मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील, मधू आपटे हे देखील व्यासपिठावर  पुरस्काराचे मानकरी होते. या सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी उमळवाड येथे माईंचा कार्यक्रम ठेवला होता.  माईंनी सोसलेल्या वेदना, व्यतीत केलेले प्रसंग, अनुभवरुपी शब्दाने समोरील उपस्थितीतांची मने हेलावून सोडली होती. प्रत्येकजण हेलावून गेला होता. त्याची स्पष्ट अनुभूती त्...