Posts

Showing posts from January, 2021

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत असणारेजगातील एकमेव शिल्प कर्नाटकातील यादवाडमध्ये

Image
       मराठा साम्राज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आज अनेक ठिकाणी पहायला मिळतात. परंतु, याच रयतेच्या राजाचे त्यांच्या हयातीतच मल्लाबाई देसाई यांनी बनवलेले पहिले शिल्प आजही कर्नाटकातील यादवाडमध्ये पहायला मिळते.         शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी  मित्र डॉ. अलोक जत्राटकर याने या संदर्भातील व्हिडीओ फेसबुकवर रविवारी अपलोड केला आणि तो पाहिल्यानंतर त्याला थेट फोन करुन त्याविषयी माहिती घेतली. त्यानंतर त्याने त्यावर स्वतंत्रपणे ब्लॉगही लिहिला. यातून यादवाडला कधी एकदा भेट देतोय असं झालं. तात्काळ यादवाडला भेट देऊन या शिल्पाचे दर्शन घेतले शिवाय या मागील ऐतिहासिक  प्रसंगाची सविस्तर माहिती  जाणून घेतली.           बेळगावच्या पुढे धारवाडला जाताना महामार्गावर असणाऱ्या धारवाड आय. आय. टी. संस्थेनंतर डावीकडे नरेंद्र फाटा लागतो. तेथून वळणा – वळणाच्या रस्त्याने अवघ्या साडेबारा किलोमिटर अंतरावर यादवाड हे गाव वसले आहे. गाव...