प्रवाशी पक्षी अन् वृक्ष
काश्मिर सफर भाग -१६ माता वैष्णोदेवीच्या यात्रेनंतर खऱ्या अर्थाने कश्मिर सफर संपले असले तरी, या पर्यटनात इथे भेटलेले प्राणी, पक्षी, वृक्षसंपदा यावर हा शेवटचा भाग आवर्जून लिहीत आहे. त्यांच्या उल्लेखाशिवाय ही सफर पूर्ण होणार नाही. इंदोर ते जम्मू रेल्वे प्रवासात हिंदी चित्रपटातून नेहमीच पाहिलेली पिवळी जर्द 'सरसों की खेती' असावी असे वाटत होते. परंतु, ती सूर्यफुलाची शेती पाठीमागे धावत होती. जम्मू येथे सुरुवातीलाच काली माता मंदिर परिसरात वानरसेनेने सलामी देत आमचे स्वागत केले होते. अगदी वाहनाच्या टपावरील प्लास्टिक कागद उचकटून! कुठेही पर्यटनाला जा, तेथे हे आपले वंशज आपल्या स्वागताला दत्त असतातच. हा अनुभव नवा नाही. पर्वत शृंखलेत उंच सरळ रेषेत वाढलेला देवदार हा तेथील काॕमन वृक्ष आढळतो. त्यापासून बॕट बनवली जाते. शिवाय डेरेदार पसरलेला चिनार हा देखील नित्याचाच बनलेला. फर, पाईन ही वृक्षसंपदाही सोबती...