Posts

Showing posts from June, 2020

लावण्यखणी...लावणी..!

Image
ढोलकीवर थाप पडली आणि पायातले घुंगरू वाजू लागले.. प्रेक्षकांनीही कळत-नकळत ठेका धरला.. "लावण्यखणी"ची वेल सर्वत्र पसरली..संपूर्ण वातावरण लावणीमय झालेले..अन.. समोर महिला प्रेक्षक असूनही चक्क शिट्ट्यांची बरसात सुरू होती. उधाणलेल्या रसिक प्रेक्षकांकडून रुमालांची उधळण होत होती. हे यश होतं ज्योती जोशी  यांच्या अदाकारीचं..‘लावणीचं!’ तेही जयसिंगपूर सारख्या परिसरात..! जायंटस् ग्रुप, सहेलीच्या तत्कालीन अध्यक्ष माधुरी चौगुले यांच्या सोबत 2007 साली खास महिलांसाठी विशेषत: सहकुटुंबियांनी लावणीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा या हेतूने ज्योती जोशी हिच्या लावण्यखणी या शोचे आयोजन केले होते. हा लेख लिहीताना बीएला मराठी वाङ्मयाचा अभ्यास करताना तंत, पंत आणि संत साहित्यावरील प्राध्यापक ए.टी. चौगुले यांनी दिलेल्या नोट्स फडताळातून शोधून काढल्या. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठात जर्नालिझमला असताना लेखक नामदेव व्हटकर यांच्या पुस्तकावर संदर्भित आणि तत्कालीन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे, मार्गदर्शित सादर केलेला परिसंवादासाठीचा लघु शोधनिबंध  शोधून काढला. यावर आधारित त्यातील काही अंश ...

आठवण..एका जन्माची..पुनःजन्माची..!

Image
* मृत्यूच्या दाढेतून सहिसलामत बाहेर पडून उद्या बरोबर आठ वर्षे होतायेत...होय तब्बल आठ वर्षे सरली. पहिली एक-दोन वर्षे केवळ आठवणीने अंगावर काटा शहारायचा पण, काळ हा सर्वांवर जालीम औषध आहे..तसे म्हणाल तर उद्या माझा दुसरा वाढदिवसच..!*   *२१ जून २०१२ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांकडे एका बैठकीच्या निमित्ताने   मंत्रालयातील 6 व्या मजल्यावर तत्कालीन संचालक प्रल्हाद जाधव, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे आणि सध्याचेही जनसंपर्क अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे, तत्कालीन आणि सध्याचे उप मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख, विशाल ढगे, तत्कालीन गृहमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी किशोर गांगुर्डे, माझे सहकारी निवृत्त अधिकारी हेमंत खैरे आणि मी असे सगळेजण एकत्र होतो. आता बैठक सुरू होणार, इतक्यात मंत्रालयाला आग लागल्याचे समजले.* *सुरूवातीला आगीची भीषणता फारशी जाणवली नाही. किरकोळ आग असावी आणि ती विझवली जाईल अशा विचारात आम्ही सगळेजण निवांत होतो.  त्यानंतर मात्र, आम्ही सगळे एकत्र असणाऱ्या दालनालाच धुरांनी वेढले आणि बाहेर दबा...

हिजडा...एक मर्द !

Image
प्रत्येक व्यक्तीच्या पाठिमागे तसेच प्रत्येक शब्दामागे त्याची एक वेगळी स्वतंत्र कथा आणि पार्श्वभूमी असते. हिजडा, छक्का असे शब्द समाजामध्ये हिणवण्यासाठी अथवा शिवी म्हणून वापरली जाते. याची पार्श्वभूमी आपल्या पौराणिक कथांमध्ये पहायला मिळते. देवांचे देव महादेव यांचे अर्धनारी नटेश्वराचे रूप, देवाने वेश बदलून घेतलेले मोहिनीचे रूप, वीर योद्यांने घेतलेले बृहन्नडेचे रूप या प्रत्येक भूमिकेमागे वेगवेगळ्या कथा वाचायला आणि ऐकायला मिळतात.   साक्षात देवानांही जिथे स्त्रीची भूमिका घ्यावी लागली तिथे सामान्य मनुष्य प्राण्याचे काय? यक्ष, गंधर्व आणि किन्नर ही परंपराच देवाधिकांपासून चालत आलेली आहे. रामायण असो वा महाभारतातील शिखंडी असो तृतीयपंथी हे सर्वसामान्य मानवाच्या पोटीच जन्माला आले आहेत. पुरूषप्रधान, पुरूषसत्ताक समाजामध्ये किंवा संस्कृतीमध्ये केवळ प्रजोत्पादन करणे हा पुरूषार्थ समजला जातो. परंतु, लहान मुले, अबला महिला आणि समाजातील, वातावरणातील सर्वच दुर्बल घटकांचे संरक्षण करणे त्याची जबाबदारी स्वीकारणे मला वाटते हा खरा पुरूषार्थ ठरेल. त्या अर्थानेच शीर्षकाचा वापर केला आहे. पौराणिक ...

लक्ष्मीपूजन

    नरकचतुर्थीची म्हणजेच आजच्या लक्ष्मीपूजनाची घरात धांदल सुरु होती. बऱ्याच वर्षानंतर मी ही यंदा गावाकडे परतलो होतो. गल्लीतील चार बायका सौ.च्या मदतीने उरले-सुरले फराळाचे पदार्थ करण्यात मग्न होत्या. आई सोनूला फराळ खाऊ घालत, त्यांना जवळ बसून मार्गदर्शन करीत होती. फराळ करता करता गल्लीतल्या अनेक चर्चांचा फडशा पडत होता. त्यात सध्या कोण, कोठे, काय करत आहे, या बरोबरच जुन्या आठवणी होत्या. या चर्चेने माझ्याबरोबरच सौ.ची चांगलीच करमणूक होत होती. वामकुक्षीनंतरही मी तसाच पडून होतो.         मध्येच चर्चा थांबवून आई म्हणाली, "उठ की रं बाबा.. किती पडून राहणार हाईस..पूजेचं साहित्यं तेवढ आण बघू चटदिशी..'         मी आळसावून बगल बदलून पुन्हा पडूनच राहिलो. पुन्हा चर्चेने जोर धरला. सुताराची भागी कशी हेंद्रट होती, तिचे किस्से ऐकायला मिळत होते. तो किस्सा संपला, तसे पदार्थ बनवूनही संपले.         "ए बसा गं..च्या पिऊन जावा.. सुप्रिया च्या ठेव बघू सगळ्यांना" अशी आईने सुनेला ऑर्डर दिली. ...

मोत्या..गुफी अन् शॅडो..व्हाया बेन्जी

Image
मी त्यावेळी अगदी तीसरी चौथीला असेन ! मोती तसा आमचा कोणीच नव्हता. घराच्या पाठिमागे राहणाऱ्या कदम उर्फ रफूवाले आजोबांनी सांभाळलेला. त्यांच्या शोभा नावाच्या मुलीने एके दिवशी हे शुभ्र, काहीसे पिंगट रंगाचे पिलू घरी आणले होते. कधी-कधी त्यांच्या घरी बसायला जायचो. परत येताना तो आमच्या मागे लागून यायचा आणि अंगणात येवून झोपायचा. मोत्याला आमचा आणि आम्हाला त्याचा लळा कधी लागला ते समजेलच नाही. त्यावेळी घरी टेंभ्याचाच काय तो प्रकाश असायचा.घरासमोर असणाऱ्या सार्वजनिक विजेच्या खांबावरील लाईटचा प्रकाश अंगणात पडत असे. मोत्या त्या प्रकाशात अंगणात पडून असायचा. अन् प्रकाशात त्याचा पांढरा रंग अगदीच भारी चमकायचा. दिवसा मात्र, तो मूळ मालकाच्या दारात पहूडलेला असायचा.             संध्याकाळी आम्ही भांवडे चहाबरोबर खारीचा चुरा खायचो. तो मोत्याला खूप आवडायचा. त्यामुळे संध्याकाळी चहाच्यावेळी हमखास तो अंगणात बसून असायचा. एके दिवशी गल्लीतील कुत्र्यांकडून झालेल्या भांडणात एका अनुभवी कुत्र्याने मोत्याच्या मांडीचा चावा घेतला. ती जखम घेवून दारी आलेल्या ...