Posts

Showing posts from September, 2022

माझी शाळा

Image
"ही आवडते मज मनापासुनी शाळा..लाविते लळा ही जसा माऊली बाळा.."   मनाच्या कोंदणात अगदी खोलवर रुतलेलं, कदाचित जपलेलं हे गीत आज उसळी घेवून वर आलं. तिसरी-चौथीत असताना माझ्या शाळेवरील हे प्रेमगीत हातामध्ये शाळेची पुठ्ठ्याची प्रतिमा घेवून म्हटलेलं आजही जसंच्या तसं आठवतय.   गल्ली क्रमांक १२ मधील जयसिंगपूर नगर परिषद शिक्षण मंडळाची शाळा क्रमांक ७ ही माझी प्राथमिक शाळा..! या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत मी शिक्षण घेतले. श्री. लंगरेसर अरे हो, त्यावेळी सर नाही गुरुजी हे संबोधन होते शिक्षकांना. दिवंगत लंगरे गुरुजी हे मुख्याध्यापक होते श्री राजमाने गुरुजी हे वर्गशिक्षक पै. पठाण बाई, श्री कोळी गुरुजी, श्रीमती आपटे बाई आणि वर्गमित्र शशीची आई श्रीमती हंकारे बाई असा शिक्षकवृंद होता.   तर, राजू भोसले, शशिकांत हंकारे, रफिक शेख, शुभदा मल्लाडे, सुषमा बुकशेट, विद्यासागर आरबाळे, राहूल जाधव, मेहेरअली गवंडी, शबाना शेख, रेहाना मुजावर, अगदी शाळेसमोर राहणारी राधा आवळे असे आम्ही सर्व वर्गमित्र! यात बरीचशी नावं अजून घालता येतील.    मारकुटे गुरुजी असा खाक्या कोळी गुरुजींचा होता. आपटेबाई...