Posts

Showing posts from 2025

🪔 हरवलेली दिवाळी🏮

Image
    सहामाही परीक्षा संपली की, आता दिवाळीची सुट्टी ! हाच सर्वात मोठा आनंद असायचा. दगड, माती, विटांचे तुकडे गोळा करुन, किल्ला बांधणीत मी गुंतलेला असायचो. त्यावर लाल मातीचा लेप चढायचा. शेवटी जंगलासाठी किल्ल्याच्या लाल मातीत हळीव-मोहरीची पेरणी होई. नित्यनेमाने त्यावर सकाळ-संध्याकाळ पाणी शिंपडले जाई. गल्लीत असे आणखी चार-पाचजण किल्ले बांधून त्याकाळी किल्लेदार झालेले असत. दररोज संध्याकाळी किल्ल्यावरही पणती, मेणबती तेवत रहायची. एव्हाना मोहरी-हळीवाचे पोट फाटलेले असे. फाटलेल्या पोटातून बाहेर येत, अंकूर सूर्याकडे लुकलुकत रहायचे. वाऱ्यावर हळूवार डोलायचे. त्यांचे मूळ लाल मातीत घुसून राही. आठवडाभरातच लालसर किल्ल्यावर हिरवट जंगल शोभून दिसायला लागे.        कधी-कधी सकाळी उठल्यावर किल्ल्याचा बुरुज कोणीतरी पाडून गेलेला असायचा. पुन्हा नव्या जोमाने तो त्याच दिवशी बांधला जाई. कोण पाडत असेल, त्यावर गल्लीत आमचा किल्लेदारांचा खल चालायचा. गडाच्या राखणीची नवी जोखीम यायची. अखेर 'शत्रू' कचाट्यात सापडायचा आणि त्याची तक्रार थेट त्याच्या घरात व्हायची. त्याला घरातून मिळालेले त...

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

Image
तरुणांना प्रेरणा देणारी ७५ वर्षीय शेतकऱ्यांच्या श्रमाची 'नाचणी'       दुर्गम, डोंगर उतारावर, जेथे निराशा आपले तळ ठोकून बसते, तेथेच काही श्रमजीवी हात मातीशी बालपणापासून संवाद साधत आहेत. चिपळूण तालुक्यातील भैरवगडाच्या पायथ्याशी वसलेल्या तळवडे ग्रामपंचायतीमधील पाते या वाडीत दत्ताराम धामणकर (वय ७५), काशिराम निकम (वय ७५), आणि राजाराम धामणकर (वय ५५) या तिघांची कष्टमय गाथा केवळ शेती नाही, तर अखंड जिद्दीचा मंत्र आहे. काही शेतकरी जेव्हा "आमची शेती दुर्गम आहे, पडीक आहे, आता त्यात काही राहिलं नाही," अशी निराशेची भाषा बोलून दाखवतात, तेव्हा याच डोंगरउतारावरील या ज्येष्ठ शेतकऱ्यांचे श्रम विशेषतः युवा पिढीला एक तेजस्वी प्रेरणास्रोत ठरतात.       गावचे पोलीस पाटील बळीराम साळुंखे यांच्यासह या शेतीला प्रत्यक्ष भेट देवून त्यांच्या श्रमाची कहानी जाणून घेतली.                   श्रमाचा महामंत्र:      या तिन्ही शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे मातीचे अधिष्ठान आणि घामाचे तीर्थ आहे. ते दररोज या कठ...

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

Image
      कोकण! जिथे नारळी पोफळीच्या बागा, काजू आंबा फणसाच्या रांगा अशा रांगांमधून होणारे सूर्यास्त दर्शन मनाला भुरळ घालते. निळ्याशार समुद्र, हिरव्यागार डोंगररांगा अशा या सौंदर्याने नटलेल्या कोकणात ‘इथे काम मिळत नाही..काम करायला माणसे मिळत नाहीत’ असा सर्वसाधारण संवाद ऐकायला मिळतो. पण, ही नकारात्मकता झुगारुन याच मातीतल्या माणसांच्या मेहनतीवर गणपतीपुळ्याच्या भूमीत वैभव सरदेसाई यांनी पर्यटनस्थळ उभारणीबरोबरच स्थानिकांच्या हाताला एक नवी कला दिली आहे. स्थानिक माणसांच्या सोबतीने किंबहुना त्यांच्या मेहनतीवरच प्राचीन कोकण, मॅजिक गार्डन या प्रकल्पानंतर लाकडी खेळणी बनविणारा ‘मैत्रेयी हॅडीक्राफ्ट’ हा प्रकल्प सुरु केला आहे.    प्राचीन कोकण-गणपतीपुळे मंदिरापासून अवघ्या काही अंतरावर अवघ्या तीन एकर जागेत 500 वर्षापूर्वीचे कोकण कसे होते हे जिवंत केले आहे. अगदी सुरुवातीलाच गुहेच्या आतमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सध्याचा कालखंड आणि गुहेतून पुढे प्रवास केल्यानंतर जुने कोकण अनुभवायला मिळते. येथील झाडांची सवर्णन करणारी पाटी केवळ माहिती देत नाही, तर त्या झाडासोबतच्या ...

आजीची भाजी रानभाजी ; दिंडा आणि पाथरी

Image
        आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे दिंडा आणि पाथरी..     दिंडा या वनस्पतीला ढोलसमुद्रीका असे स्थानिक नाव आहे. औषधामध्ये दिंडा चे मूळ वापरले जाते. वनस्पतीत ग्राही, वेदनास्थापन आणि रक्तस्कंदन हे इतर औषधी गुणधर्म आहेत. कंदाचा लेप नायट्यावरही प्रसिध्द आहे.      दिंड्याचे देठ शेवग्याच्या शेंगांप्रमाणे दिसेपर्यंत सोला. नंतर चिरुन धुवून घ्या. एका कढईत तेल गरम करुन मोहरी, जिरे व हिंग टाका. त्यात कांदा, लसूण घाला. गुलाबी झाल्यावर गरम मसाला व चिरलेली भाजी टाका. झाकण ठेवून मंद आचेवर ...

आजीची भाजी रानभाजी ; कमजोरी दूर करणारी कुर्डू

Image
    याला कुर्डू पांढरा कोंबडा, मोरपंख असे सुध्दा स्थानिक नावाने ओळखले जाते. सांधेदुखी जाण्यासाठी, कमजोरी दूर करण्यासाठी, थकवा जाण्यासाठी, मूतखडा बाहेर काढण्यासाठी, दाताचे विकार नाहीसे करण्यासाठी याचा फायदा होतो. तोंडाचे विकार, स्त्रियांच्या तक्रारी, जास्त रक्तस्त्राव, मूत्रपिंडाच्या तक्रारी अशा अनेक व्याधींवर ही वनस्पती उपयुक्त आहे.  कूर्डू ही वनस्पती त्री दोष नाशक म्हणजे कफ, वात, पित्तशामक आहे. या वनस्पतीच्या फुलांमध्ये काळे व चमकदार बीज असते.  हे बीज आयुर्वेदामध्ये अतिउपयुक्त मानले जाते.      आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या ...

आजीची भाजी रानभाजी ; भुईआवळा आणि उंबर

Image
        आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे भुईआवळा आणि उंबर..           भुईआवळा वनस्पतीत फायलॅनथीन नावाचे द्रव्य आहे. काविळ झाल्यास भुईआवळा वाटून दुधाबरोबर सकाळ संध्याकाळ देतात. यकृतवृध्दी व प्लीहावृध्दी कमी करण्यास याचा वापर करतात. या वनस्पतीमुळे लघवीचे प्रमाण वाढते व दाह कमी होतो. लघवी कमी होणे, मूतखडा, जंतूसंसर्ग आदी विकारांतही या भाजीच्या सेवनामुळे चांगला गुण येतो. भुईआवळ्याची भाजी आंबट असून, या वनस्पतीचा उपयोग विषाणूजन्य तापात केला जातो. कावीळमध्ये या भाजीचा चांगला उपयोग असल्याचे ...

आजीची रानभाजी ; लाल भोपळा अन् आंबुशी..

Image
         ' चल रे भोपळ्या टुणूक टुणूक..' या कथेतून या भोपळ्याची तशी बालपणीच ओळख झालेली आहे. थोडे कळू लागल्यावर या भोपळ्याची पिवळी, केसरी फोड बाजारात सतत पहायला मिळालेली.  शिवाय गोड घारगे खायला कोणाला आवडणार नाहीत..तो रुचकर पदार्थही यापासूनच बनवला जातो.   आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे लाल भोपळा आणि आंबुशी..          लाल भोपळा हे एक वेलवर्गीय फळ आहे. त्याच्या पानांची तसेच फळाची भाजी बनवली जाते. त्याचबरोबर भोपळ्याची खीर आणि पराठे बनवले जातात. भोपळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे...

तुंगाकाठी भाग-२; मध्ययुगातील अनोखी स्थापत्यकला गोल घुमट

Image
      अतिशय आनंदी आणि प्रसन्न वातावरणात आम्ही विजापुरात पोहचलो. खरंतर जवळपास प्रत्येकांनी हा गोलघुमट पाहिलेला. मी तर दोन-तीनवेळा, अगदी सातवी-आठवीत असताना सतीशकाकांसोबत सर्वप्रथम पाहिलेला.       इतिहासाच्या पुस्तकात 'विजापूरची आदिलशाही' हा उल्लेख आवर्जून सर्वांनी वाचलेला. भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्या अखत्यारित ही वास्तू आहे. या ठिकाणी केवळ आॕनलाईन तिकीट घ्यावे लागते.       प्रवेशदारापासूनच आपा-पल्या छबी टिपण्यास सुरुवात झालेली. दुतर्फा बगिचा, दूरवर पाठीमागे गोल घुमट वास्तू, इतिहासाचे अस्तित्व दाखवणाऱ्या ढासळलेल्या, उघड्या-बोडक्या जीर्ण इमारतींचे अवशेष तग धरुन आजूबाजूला बसलेलेले.         समोर पुरातन वस्तू संग्रहालयाची भव्य इमारत. त्याच्या प्रांगणात दोन्ही बाजूला दिमाखदार जणू सज्ज असणाऱ्या तोफा. आज संग्रहालय बंद होते. परतताना या तोफांचा इतिहास समजून घेवू. त्यामुळे या इमारतीला डावीकडून वळसा घालून आम्ही गोल घुमटाकडे सरकलो.     दगड्या पायऱ्या चढून लाकडी मोठाल्या दरवाजामध...

आजीची रानभाजी ; महाऔषधी म्हाळुंग

Image
      लिंबू, संत्री, मोसंबी अशा वर्गात महाळुंग/गळलिंबू हे पण एक अत्यंत रुचकर असे फळ आहे. फळ साधारण पेरूच्या आकाराचे पण लिंबा पेक्षा सात आठ पटीने मोठे असते. फळाची साल बरीच जाड असते. फळाचा मध्य भाग आंबट असतो. म्हाळुंग एक औषध म्हणून उत्तम गुण देते.        आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे म्हाळुंग/गळलिंबू..     आजारपणातून उठल्यावर तोंडाला चव नसेल तर म्हाळुंग सेवन करावे. अत्यंत रुची उत्पन्न करणारे फळ आहे. उचकी, दमा, जुनाट कोरडा खोकला यात म्हाळुंग सेवन करणे लाभदायक आहे. म्हाळुंगचे फळ नियमित खाल्ले ...

आजीची रानभाजी ; कंदमुळ रताळे

Image
        रताळे हे एक पौष्टिक कंदमूळ अहे. उपवासाच्या दिवसात विशेषतः महाशिवरात्रीच्या उपवासासाठी रताळे मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. गोड बटाटा (स्वीटपोटॅटो) म्हणून ओळखले जाणारे हे कंदमूळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उपवासाच्या काळात रताळ्याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा देण्याचे काम होते.     आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे रताळे..       स्टार्चने परिपूर्ण असल्यामुळे रताळ्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. रताळ्यांमध्ये 'अ' आणि 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. विशेषतः केशरी रंगाच्या रताळ्याम...

तुंगाकाठी..भाग-१ : दोनाचे आठ..चाराचे तेरा..

Image
    माझे आणि सौ चे आजवर भरपूर पर्यटन झाले. परंतु, अगदी शेजारच्या राज्यात असणारे हंपी, बदामी जायचे जायचे म्हणत नेहमी ते रहायचे. सोनूला चल म्हणालो. तसा, 'आईबरोबर दोनवेळा जावून आलोय', असे तो म्हणाला. मला मात्र, ते आठवत नव्हते.      सौ ची अन् माझी बहुतेकवेळा चर्चा व्हायची. परंतु, दुसरीकडेच आम्ही भटकून यायचो. त्यामुळे ते रहात होते. यावेळी मात्र, जाम ठरवूनच टाकले होते. हंपी-बदामीशिवाय कोठे जायचेच नाही.  काही झाले तरी यावेळी जायचेच. एक-दोघा मित्रांनाही येण्याबाबत विचारले. त्यातील काहीजण जावून आलेले. तर, काहींना नोकरी-व्यवसायातून वेळ मिळेल असे वाटत नव्हते.        नेहमीप्रमाणे चर्चा झाली. सुरुवातीला माझे एनसीसी चे शिक्षक डाॕ ब्रिजकिशोर राठोड सर आणि त्यांच्या सौ, रेखा राठोड मॕडम असे चौघेच जायचे ठरले. त्यानंतर कागलचे अनिल पोवार, बिना पोवार हे दोघे येण्यास उत्सुक असल्याचे समजले. त्यांच्या जोडीला लगेचच चंदनशिवेसरांच्या जोडीचा 'पर्यटक संगम' झाला.      सुरुवातीला इर्टिगामधून जायचे ठरले होते. चाराचे सहा अन् सहाचे कधी तेरा झाले...

आजीची भाजी रानभाजी करवंद

Image
      'आजी आणि तिची रानभाजी' ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी 'आजीची भाजी रानभाजी' ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची भाजी आहे, करवंद..       करवंदांमध्ये 'क' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. पित्तावर हे फळ अत्यंत गुणकारी ठरते. कोलेस्ट्राॕलचे प्रमाण कमी करण्यास हे फळ मदत करते.  त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाण देखील करवंद कमी करते.  करवंदाच्या सालीचा उपयोग विविध त्वचारोगावर केला जातो. च्युइंग गम बनविण्यासाठी देखील याचा उपयोग करतात.     सरबत तयार करण्यासाठी पूर्ण वाढ झालेली एक किलो करवंदे निवडावीत. दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवावीत. एक लिटर पाण्यात ही ...

आजीची रानभाजी ; बहुउपयोगी आणि पौष्टिक शेवगा

Image
        रेषेदार लांब शेवग्याच्या शेंगा सर्वांच्याच परिचयाच्या आहेत. याला मोरिंगा, ड्रमस्टिक म्हणूनही ओळखले जाते. खास करुन इडली सांबारात शेंगेचा वापर असतोच. पण, बहुतेकजण ही शेंग बाजूला काढून ठेवतात. या बहुउपयुक्त पौष्टिक शेवग्याची आज माहिती घेवू.        उष्णकटिबंधीय आणि समशितोष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळणारा शेवगा सुमारे १० मीटरपर्यंत वाढणारा बहुउपयोगी वृक्ष आहे. या वृक्षाची फुले, पाने तसेच शेंगांचा वापर विविध प्रकारच्या पाककृती बनवण्यासाठी केला जातो. दुधाच्या ४ पट आणि मटणाच्या ८०० पट कॕल्शियम व फॉस्फरस, तुरट असूनही हा चवीचा बादशहा, ३०० विकारांवर मात करणारी, कुपोषण दूर करणारी ही भाजी अत्यंत पौष्टिक मानली जाते.          शेवग्याच्या पानांची भाजी ही सहज उपलब्ध होणारी रक्तदाब नियंत्रित करणारी रानभाजी आहे. बाळाच्या पाचवीला ही भाजी सटवाईला नैवेद्य म्हणून दाखवली जाते आणि नंतर बाळाच्या आईला खाण्यास दिली जाते, ज्यामुळे तिला पोषण मिळते.         शेवग्याच्या पानांच्या रसाने केसांना मालिश केल्याने केसातील को...

लुप्त कलंदर अन् गंगाराम

Image
          सोनूचे हे महाविद्यालयाचे शेवटचे वर्ष होते. सौ ला पहिली पदोन्नती मिळालेली आणि  दुसऱ्या पदोन्नतीसाठी रत्नागिरी साद घालत होती. तब्बल चार वर्षानंतर इंदोर सोडून गावी परतण्याचा निर्णय झालेला. चला तर मग उरले-सुरले, राहिलेलेही इंदोर फिरुन घेवू, म्हणून मी आणि सौ दुचाकीवरुन बाहेर पडलो. महानगरपालिकेच्या प्रसिद्ध 'कमला नेहरु चिडिया घर' अर्थात प्राणी संग्रहालयात गेलो. तिकीटाचा सोपस्कार पूर्ण करुन आतमध्ये प्रवेश केला. देखण्या वन्यजीवांची एकेक दालने पार करत पुढे सरकत होतो. एका भव्य जाळी समोर आल्यावर आतमध्ये खाली खंदक दिसला. वरुन पाहताना खंदकाला लागूनच एका बाजूला एक काळे अस्वल आपल्याच तालात एका टोकाहून दुसऱ्या टोकाला अगदी चावी दिलेल्या खेळण्याप्रमाणे एकसारखे येरझाऱ्या घालत होते. जणू शतपावलीच ती ! दुसरीकडे त्याची जोडीदारीण बसून होती. बराचवेळ त्याची चावी संपलेली दिसत नव्हती. आम्हाला पाहून अजिबात त्याचे लक्ष विचलित होत नव्हते. आपल्याच येरझाऱ्यात तो रममाण झालेला.        सिक्किमनंतर आज पुन्हा प्राणी संग्रहालयात अस्वल पहात ...

आजीची भाजी रानभाजी ; गोखरु व शतावरी

Image
        'आजी आणि तिची रानभाजी' ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी 'आजीची भाजी रानभाजी' ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजच्या भाज्या आहेत, गोखरु व शतावरी..       गोखरु या वनस्पतीला सराटा, काटे गोखरु, लहान गोखरु, गोक्षुर अशी स्थानिक नावे आहेत. उष्ण, कोरड्या कमी पावसाच्या प्रदेशात ही जमिनीवर वाढणारी रोपवर्गीय वनस्पती आहे. गोखरु हे तण असले तरी ती महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. गोखरु स्नेहन, वेदनास्थापन, मूत्रजनन, संग्राहक व बल्य आहेत.  शीतल असून मूत्रपिंडास उत्तेजक आहेत. गोखरुची फळे मुत्राच्या विकारांवर, लैंगिक आजारपणात अत्यंत उपयोगी आहेत.       भाजीसाठी गोखरुची...