*"मोडा"तून भरलेत कुंडीत बटाटे..!*😄
"सौ" बरोबर भाजी खरेदी करताना आपण केवळ "भार वाही हमाल..!"😝 याच भूमिकेत मी असतो. समस्त पुरुष मंडळींना हा अनुभव नवा नसावा, असो..! आठवड्याची भाजी "सौ" बरोबर खरेदी करताना कांदा-लसूणच्या जोडीला बटाटा हा आलाच. तसा याही वेळेला बटाट्यांचा नंबर हा लागलाच होता. गोल-मटोल, गरगरित वाटोळे, तुक-तुकित कांतीचे हे बटाटे बाजारातील विस्कटलेल्या उन्हातील जागेतून थेट घरातील मुदपाकखान्यातील भाजीपात्रातील हक्काच्या जागेत समाधानाने स्थिरावले होते. मुदपाकखान्यात गरजेप्रमाणे यांचा नंबर जवळ येत होता. यातले बरेच त्यांच्यासारखीच आमची गरगरीत 'ढेरी' बनवण्यासाठी 'क्षुधाशांती' च्या नावावर खर्ची पडले होते.😍😋 अशारितीने अखेर त्यांचा इहलोकीचा प्रवास संपला होता.😝 कांदा-लसूणच्या आडोशाचा आधार घेत दोन 'छुपे बुटुटूम' एके दिवशी दिसून आले. आणले त्यावेळी असणारा गरगरितपणा जरा ढिला होवू पहात होता. तुकतुकित कांती सोडून जात होती. अकाली वृद्धत्वाच्या रेषा पसरत होत्या. भरीस-भर म्हणून की काय त्यांना बसून-बसून आलेला जाम वैताग 'सर्वांगावरील मोड'ने आ...