रानपिंगळ्यांची वसाहत..
बहुतेकजण पिंगळ्यालाच घुबड मानतात. साक्षात लक्ष्मीमातेचे वाहन असणारे घुबड आजही अशुभ मानले जाते. घुबड, गव्हाणी घुबड, पिंगळा-रानपिंगळा हे मानवाचे विशेषतः शेतकऱ्यांचे मित्र आहेत. उंदीर हे यांचे आवडते खाद्य असल्याने, मोठ्या प्रमाणात उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे ते काम करतात. खरं तर पिंगळा-रानपिंगळा हा घुबड संवर्गातील पक्षी ! छोटेखानी घुबडच! घुबडापेक्षा आकाराने छोटा असतो. असो..पिंगळ्याची जोडी नितांतपणे रात्रीच्या काळोखात भाकणूक करताना अनेकवेळा जाणवते. असे हे रानपिंगळे मला भटकंतीत अनेकवेळा आढळले आहेत. पण, काल आणि आज त्यांची वसाहत पहायला मिळाली. अगदी शिरपूर तलावाला खास पक्षी निरीक्षण करताना, माणसाप्रमाणे डोळे मिचकवणारा रानपिंगळा पहायला मिळाला. यावेळीही आई-बाबा पिलांना प्रशिक्षित करताना दिसत होते. ग्रामसंस्कृती जागवणारे, कुडबुडे जोशी पिंगळे माझ्या लहानपणी गल्लीत यायचे. डोक्याला पटका, अंगात तीन बटणी शर्ट, त्यावर कळकटलेला कोट, खाली पांढरे पायघोळ धोतर,...