Posts

Showing posts from 2023

रानपिंगळ्यांची वसाहत..

Image
        बहुतेकजण पिंगळ्यालाच घुबड मानतात. साक्षात लक्ष्मीमातेचे वाहन असणारे घुबड आजही अशुभ मानले जाते. घुबड, गव्हाणी घुबड, पिंगळा-रानपिंगळा हे मानवाचे विशेषतः शेतकऱ्यांचे मित्र आहेत. उंदीर हे यांचे आवडते खाद्य असल्याने, मोठ्या प्रमाणात उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे ते काम करतात.      खरं तर पिंगळा-रानपिंगळा हा घुबड संवर्गातील पक्षी ! छोटेखानी घुबडच! घुबडापेक्षा आकाराने छोटा असतो. असो..पिंगळ्याची जोडी नितांतपणे रात्रीच्या  काळोखात भाकणूक करताना अनेकवेळा जाणवते. असे हे रानपिंगळे मला भटकंतीत अनेकवेळा आढळले आहेत. पण, काल आणि आज त्यांची वसाहत पहायला मिळाली.        अगदी शिरपूर तलावाला खास पक्षी निरीक्षण करताना, माणसाप्रमाणे डोळे मिचकवणारा रानपिंगळा पहायला मिळाला. यावेळीही आई-बाबा पिलांना प्रशिक्षित करताना दिसत होते.          ग्रामसंस्कृती जागवणारे, कुडबुडे जोशी पिंगळे माझ्या लहानपणी गल्लीत यायचे. डोक्याला पटका, अंगात तीन बटणी शर्ट, त्यावर कळकटलेला कोट, खाली पांढरे पायघोळ धोतर,...

फणसाचा ‘गरा’ ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा ‘हिरा’!

Image
                ‘कुटुंबवत्सल इथे फणस हा                  कटी खांद्यावर घेऊनी बाळे’ मराठी व्याकरणात चेतनगुणोक्ती अलंकारासाठी उदाहरण असणारा हा फणस आकाराने जितका मोठा तितकाच त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा असल्याचे प्रत्यक्षात उदाहरण ठरला आहे. फणसाचा ‘गरा’ शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा ‘हिरा’ ठरत असल्याचे लांजा तालुक्यातील झापडे गावच्या फणसकिंग हरिश्चंद्र देसाई आणि मुलगा मिथिलेश यांनी आपल्या प्रकल्पातून जगासमोर आणले आहे. कोकण म्हटलं की आपसूक आंबा, फणस, काजू ही नावे समोर येतात. परंतु आंबा आणि काजूप्रमाणे फणसाची लागवड अशी करुन कोणीही बाग करत नाही. नेमके हेच हेरत हरिश्चंद्र देसाई यांनी जवळपास 10 वर्षापूर्वी फणस लागवडीचा विचार करुन तो प्रत्यक्षात आणला. सुरुवातीला आवड म्हणून केलेली फणसाची लागवड ही मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून लागवडीखाली आली. जगभरातील जातींमधील 86 प्रकारच्या जातीचे 1500 फणसाची लागवड केली आहे. सर्वसाधारणपणे मे आणि जूनला फणस होतो. जूनमध्ये होणारा फणस वाया जातो. म...

अबब..५५ फुटी देवमाशाचा सांगाडा..अर्धशतक पार कासव..अन् बरंच काही..

Image
      डायानासोरपेक्षा मोठा असणाऱ्या देवमाशाचा ५५ फुटी सांगाडा 'इथे' ठेवला आहे. आयुष्याची ५० हून अधिक वर्षे पार केलेले जिवंत कासव आजही शांतपणे पोहताना 'इथे' दिसते. काचेसारखा पारदर्शक ग्लास फिश अर्थात काचूक मासा तोही पोहताना 'इथे' दिसला. गोड्या पाण्यातील आणि सागरी पाण्यातील माशांच्या जवळपास ९० प्रजाती मत्स्यालयात, तर २५४ समुद्री जलचरांच्या प्रजाती रसायनामध्ये मत्स्यसंग्रहालयात जतन करुन ठेवण्यात आल्या आहेत. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या रत्नागिरी येथील झाडगाव मधील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राने सुरु केलेल्या मत्स्यालयात हे सर्व आपल्याला पाहायला मिळते.      हे मत्स्यालय अतिशय चित्ताकर्षक असून यामध्ये गोड्या पाण्यातील माशांचे अॕक्वेरियम, सिक्लीड माशांचे अॕक्वेरियम, टेडप्लांटेड (पाणवनस्पतींचे) अॕक्वेरियम तसेच मरीन अॕक्वेरियम बनविण्याकरिता आधुनिक फिल्टरेशन व प्रकाश योजनेचा उपयोग इथे करण्यात आला आहे.    मत्स्यालयामध्ये प्रदर्नामध्ये माशांच्या ठेवण्यात आलेल्या प्रजातींमध्ये अरोवाना मासा, हम्पी हेड फ्...

प्रवाशी पक्षी अन् वृक्ष

Image
                 काश्मिर सफर भाग -१६                       माता वैष्णोदेवीच्या यात्रेनंतर खऱ्या अर्थाने कश्मिर सफर संपले असले तरी, या पर्यटनात इथे भेटलेले प्राणी, पक्षी, वृक्षसंपदा यावर हा शेवटचा भाग आवर्जून लिहीत आहे. त्यांच्या उल्लेखाशिवाय ही सफर पूर्ण होणार नाही.       इंदोर ते जम्मू रेल्वे प्रवासात हिंदी चित्रपटातून नेहमीच पाहिलेली पिवळी जर्द 'सरसों की खेती' असावी असे वाटत होते. परंतु, ती सूर्यफुलाची शेती पाठीमागे धावत होती. जम्मू येथे सुरुवातीलाच काली माता मंदिर परिसरात वानरसेनेने सलामी देत आमचे स्वागत केले होते. अगदी वाहनाच्या टपावरील प्लास्टिक कागद उचकटून! कुठेही पर्यटनाला जा, तेथे हे आपले वंशज आपल्या स्वागताला दत्त असतातच. हा अनुभव नवा नाही.       पर्वत शृंखलेत उंच सरळ रेषेत वाढलेला देवदार हा तेथील काॕमन वृक्ष आढळतो. त्यापासून बॕट बनवली जाते. शिवाय डेरेदार पसरलेला चिनार हा देखील नित्याचाच बनलेला. फर, पाईन ही वृक्षसंपदाही सोबती...

माता वैष्णोदेवी

Image
                   काश्मिर सफर भाग - १५                     काश्मिर सफरमधील शेवटचा टप्पा म्हणजे माता वैष्णोदेवीचे दर्शन होते. कटराला जाण्यासाठी पहेलगामहून निघालो खरा. परंतु, वाहतुकीच्या प्रचंड कोंडीत सापडत होतो. काही वेळाने वाहतूक सुरु झाली. तसे, वाहन दामटतच चालक नेत होता. बनियाल काझीगुंड या साडेआठ किमीच्या जवाहर भोगद्यात बराच वेळ थांबावे लागले. अखेर बोगद्यातून बाहेर पडलो.          काही दिवसानंतर सुरु होणाऱ्या अमरनाथ यात्रेची व्यवस्था प्रशासन जागोजागी करत असल्याचे दिसत होते. यात्रेकरूंसाठी राहण्याची, जेवणाच्या लंगरची आणि स्वच्छतागृहांची सोय उभारली जात होती. काही ठिकाणी उभारली होती. चार पदरी, सहा पदरी रस्ते असूनही काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु असल्याने आणि एकूणच मोठ्या वाहतुकीमुळे ही कोंडी सातत्याने होत होती.        अशा कोंडीतून जामेल तशी वाट मिळवत रात्री उशिरा थंडीत एकदाचे कटरामधील हाॕटेलवर पोहचलो. सकाळी पहाटे उ...

'बेताब' पहेलगाम

Image
काश्मिर सफर भाग - १४           पहेलगाममध्ये पोहचलो तेव्हा रात्र झाली होती. शिवाय दिवसभर घोड्यावरची रपेट अन् बर्फातील खेळण्यामुळे आता विश्रांतीची तशी खरी आवश्यकता होती.         सकाळी पहाटेच जाग आली. तसे सर्वजण आवरुन आम्ही हाॕटेलच्या प्रांगणात आलो. मस्त हिरवळ, भोवताली आक्रोडची झाडे आणि दूरवर हिमनग डोक्यावर घेवून उभे पर्वत! अशी ही सकाळ होती. याठिकाणी जो-तो आपली आणि आपल्या सहकाऱ्यांची छबी टिपण्यात गुंतला होता.         या ठिकाणाहून पहेलगाममधील काही निवडक पाॕईंट फिरण्यासाठी स्थानिक वाहन भाड्याने करावे लागते. त्यासाठी टूर मॕनेजर वैशाली परदेसी या वाहन ठरवत होत्या. तोपर्यंत नाश्ता आणि फोटोसेशनमध्ये अद्यापही बरेचजण व्यस्त होते.          एकदाचे वाहन ठरले तसे आम्ही पर्यटनाला बाहेर पडलो.  'गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्त, हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्तो’ अर्थात जर धरतीवर कोठे स्वर्ग आहे, तर तो स्वर्ग येथे आहे, येथे आहे, येथे आहे, केवळ येथेच आहे. हे, पहेलगामसाठी लागू ठरते.  ...

'जन्नत-ए-कश्मिर' च्या सौंदर्याची खाण..गुलमर्ग!

Image
काश्मिर सफर भाग - १३           लहानपणी दारात बर्फाचा गोळेवाला यायचा..रणरणत्या उन्हात त्याचा गारवा खऱ्या अर्थाने उदरापेक्षा मनाला देवून जाई. इथे तर समोर बघेल तिकडे केवळ बर्फच बर्फ दिसत होता. शेकडो पर्यटक त्याचा आनंद घेत होते. आम्हीही मग त्यात सामील झालो. बर्फाचे गोळे एकमेकांवर मारत होतो. अगदी जत्रेत भंडारा उधळल्याप्रमाणे हवेत, अंगावर बर्फ उधळत होतो. देहभान हरपून! पुढे दूरवर बर्फाचेच पर्वत खडा पहारा देत उभे होते. जणू स्वागताला आलेले.        वर निळसर-पांढरे आकाश आणि त्याला टेकलेले पांढऱ्या शुभ्र बर्फाने संपूर्णपणे अंगभर माखलेले अन् उन्हात चमकणारे पर्वत, ताडासन करत आकाशाकडे झेपावलेले त्यावरील वृक्ष, हा स्वर्गीय नजारा मोहिनी घालून नजर खिळवून ठेवत होता. त्यातच पुन्हा ऊन जावून ढगाळ वातावरण होताना अंधारुन येणारे ढग सावलीच्या चादरीसह पळ काढत होते. आकाशरुपी कॕन्व्हासवर जणू अनेक कुंचले क्षणार्धात निसर्ग फिरवत होता. हे अलौकिक सौंदर्य डोळे भरुन पहात होतो. साठवत होतो.       एस्किमो लोक बर्फात स्लेज गाडीचा व...

खतरनाक मार्गाचा सुखद शेवट गुलमर्ग

Image
                     काश्मिर सफर भाग-१२                   प्रसन्न वातावरणात पुन्हा एकदा टपोऱ्या लालभडक गुलाबांच्या ताटव्यासोबत श्रीनगरच्या आठवणी सोबत घेवून गुलमर्गकडे जाण्यासाठी निघालो. आज वाहनांची वर्दळ जास्त दिसत होती. विशेषतः पर्यटकांची वाहने! कदाचित त्यामुळे प्रत्येक चौकात सीआरपीएफ जवानांसोबत वाहतूक पोलीसदेखील दिसत होते. स्थानिक पोलीस वाहनांची तपासणी करत होते. बऱ्याच  ठिकाणी सीआरपीएफ आणि पोलीसांची वाहनेही लावलेली होती. बहुतेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु होती.           एके ठिकाणी मुख्य महामार्गावरुन गुलमर्गकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनाने धाव घेतली. हा चढणाचा आणि वळणा-वळणाचा रस्ता होता. हवेतील गारवा, दोन्ही बाजूला असणारी उंचच उंच देवदारची राई, त्यामधून दिसणारे पांढरे निळे आकाश, सोबत पर्वत राजीमध्येच खोल गडप होणाऱ्या दऱ्या हे सगळं आल्हाददायक आणि भारुन टाकणारं असं होतं.          बारामुल्ला जिल्ह्यातील ग...

हाऊसबोटीवरील मुक्काम..

Image
              काश्मिर सफर भाग -११                   कपडे भिजलेल्या अन् कुडकुडणाऱ्या अवस्थेत स्वतःला वाळवत सोनमर्ग ते श्रीनगर प्रवास उभा राहून केला. पण, झीपलाईन क्राॕसिंग आणि रिव्हर राफ्टींगच्या सुखावून देणाऱ्या आनंदात ते भिजणे अन् कुडकुडणे आता हरवत होते. अत्यंत वर्दळीच्या अणि वाहतूक कोंडीतून वाहन अक्षरशः दामटत श्रीनगरला हाॕटेलवर पोहचलो.         आजच्या रात्रीचा पडाव हाऊसबोटीत असल्याने जेवणानंतर आवश्यक साहित्यासह दल लेकच्या काठी रात्री आलो. निरव शांतता पसरलेली. काळा कभिन्न अंधार. मधूनच आलेल्या वाहनांच्या दिव्यांचा झोत पडायचा. त्यात दल लेकचे झोपलेले पाणी कुस बदलताना दिसायचे. पाण कोंबड्यांची खुसपूस, कुठेतरी मास्यांच्या उसळीने झोपेतील दल लेकचे पाणी चुबुक आवाजाने घोरत होते. हाऊसबोटीमधील दिवे दूरवरुन चांदण्याप्रमाणे भासत होते.          हा सर्व नजारा निरव शांततेत टिपत असतानाच, पाण्याला खच्चून जागे करत दोन शिकारे आम्हाला हाऊसबोटीवर घेवून जाण्यासाठी येत हो...