Posts

Showing posts from March, 2022

भोसले सायकल मार्ट..दळण-वळणाचे एक केंद्र..!

Image
        "अंधेरी रात थी..वो मेरे साथ थी..मैं उसके उपर था..वो मेरे निचे थी..बताओ वो मेरी कौन थी..?" अशी अनेक तर्कावर आधारित बौध्दिक चाचणी घेणारी शाब्दिक कोडी ज्याला कधीकाळी 'हुमान' म्हणून ओळखले जायचे, ती प्रत्येकांंनीच अवकाशातील टांगलेल्या झुंबरांच्या, तारकापूंजांच्या चमचमणाऱ्या काजव्यांत अंगणात बसून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. काहिंनी सोडवली देखील असतील.         होय, वाचकांनो वरील प्रश्नाचे अपेक्षित उत्तर 'सायकल' आहे. पूर्वीच्या काळी घड्याळ, रेडिओ आणि त्यापुढे जावून सायकल असणे, हा गावात कौतुकाचा आणि प्रतिष्ठेचा विषय गणला जाई. या वस्तू पहायला कधीकाळी गाव लोटले जाई, हे आजच्या पिढीला नवल वाटेल.       पुढे म्हणजेच आपल्या बालपणी ज्यांना सायकल विकत घेणे परवडत नसायच्या, त्यांच्यासाठी सायकली भाड्याने मिळत. जयसिंगपूर बसस्थानक आताच्या क्रांती चौकात कोणी उतरला तर तेथूनच पुढे अवघ्या २५-३० पावलांवर 'भोसले सायकल मार्ट' आहे. अगदी आजही जसेच्या तसे मूळ अंगात वसलेले. लाकडी फळ्यांच्या झडपेत बनवलेला दरवाजा ही 'दुकानाची' खरी ओळख आजही मार्ट...

श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र महावीर तपोभूमी

Image
      उज्जैन येथील महाकालेश्वरचे दर्शन घेवून इंदोरला परतताना अवघ्या काही अंतरावर अगदी महामार्गालगत वाटेतच भगवान महावीरांची तपोभूमी आहे. पूज्य गुरुदेव मुनिश्री प्रज्ञासागरजी महाराज यांच्या प्रेरणेने या सुंदर, सुव्यवस्थित, अती रमणीय तपोभूमीची निर्मिती करण्यात आली आहे.     उज्जयनी ही एक ऐतिहासिक, पौराणिक आणि अतिप्राचीन नगरी आहे. क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेल्या या उज्जयनीचे आज उज्जैन नामकरण झाले. भगवज्जिनसेनाचार्य कृत 'आदिपुराण' मध्ये भगवान ऋषभदेव यांनी भारताला ५२ जनपदांमध्ये अर्थातच जिल्ह्यात विभाजित केले होते. त्यामध्ये 'अवंती' हा एक होता. प्राचीन काळात अवंतीची राजधानी उज्जयनी होती. सातव्या-आठव्या शतकात अवंतीचे नाव मालवा झाले.         आचार्य गुणभद्र स्वामींनी उत्तर पुराणात लिहिले आहे की, दीक्षा घेतल्यानंतर भगवान श्री महावीर स्वामी मुनी अवस्थेमध्ये विहार करत उज्जयनीला आले आणि योग धारण करुन ध्यानस्थ झाले.      येथील स्मशानात राहणारा स्थाणू रुद्र नावाच्या दैत्याने त्यांची ध्यानधारणा भंग करण्याचा प्रयत्न केला...