Posts

Showing posts from 2020

स्वामीनिष्ठेची प्रेरणा देणारा शेवटाचा..टोकाचा गड..अर्थात पारगड..!

Image
घनदाट, निबिड अरण्यात छातीचा कोट करुन गोवा-कर्नाटकातील हालचालींवर स्वराज्याच्या रक्षणार्थ आपली नजर रोखून उभा असणारा आणि आपल्या स्वामीनिष्ठेची प्रेरणा देणारा गड..पारगड..! अगदी शेवटाचा..टोकाचा तो पारगड..!    छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला, इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असणारा हा गड दुर्गप्रेमींसाठी आणि शिवभक्तांसाठी ऐतिहासिक घटनांना उजाळा देत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत विसावला आहे.    चंदगडमधील हेरेपासून अवघ्या २४ किमी अंतरावर हा गड आहे. सह्याद्रीच्या उंचच- उंच डोंगर रांगांमधून, लता-वेली, जंगली आणि औषधी झाडांच्या घनदाट अरण्यामधून ही वाट गडाच्या पायथ्याला जाते. या ठिकाणापासून ३६० पायऱ्या चढून गेल्यानंतर शिवकालीन तोफांच्या अवशेषांचे दर्शन होते. बाजूलाच हनुमानाचे मंदिर असून, या ठिकाणी पुरातन अस्तित्वाची साक्ष देणारे तुळसी वृदांवन दिसते. या पायऱ्यांपासून थेट गडावर जाण्यासाठी गडाच्या मागील बाजूस वाट आहे. सध्या या वाटेने चारचाकी वाहन वर जाते. कोकण आणि गोव्याच्या सीमेवरील या गडाचे महत्त...

जिल्हा परिषदेच्या मतिमंद शाळांमधील विद्यार्थ्यांची पंखाविना भरारी

Image
आकाश कंदील, पणत्या, उटणे, मेणपणत्यांसह भेटवस्तुंची 9 ते 11 नोव्हेंबर विक्री जिल्हा परिषदेच्या मान्यताप्राप्त दिव्यांग, मतिमंद, गतिमंद मुलांच्या शाळांमधील या विशेष मुलांनी दिवाळीसाठी आकर्षक आकाश कंदील, रंगीबेरंगी पणत्या, उटणे, मेणबत्त्या यांच्यासह भेटवस्तू तयार केल्या आहेत. यंदाच्या गिफ्ट पॅकमध्ये साबण-तेलांसोबतच सॅनेटायझरच्या बाटलीचाही समावेश झाला आहे. बनवलेल्या या वस्तुंची विक्री जिल्हा परिषदेच्या आवारात 9 ते 11 नोव्हेंबर या तीन दिवसात होणार आहे. या विद्यार्थ्यांची  स्पेशल ऑलंपिक, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग पाहून पंखाविना भरारी काय असते ते दाखवून दिले आहे.  इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्वयम मतिमंद शाळेतील उद्योग केंद्राच्या अध्यक्ष शोभा तावडे यांनी माहिती दिली. या शाळेतील उद्योग केंद्रात 18 वर्षापुढील 56 मुले आहेत. अत्यंत सुंदर पध्दतीने गणेश मूर्ती तयार करतात. वेगवेगळी फुले तयार करतात. दिवाळीसाठी उपयोगी असणाऱ्या वस्तूंचे बॉक्स तयार करण्यात येत आहे. फाईल तयार करण्यात येतात शिवाय पेंटींगचे प्रदर्शनही भरवण्यात येत असते. दुर्लक्षीत असणाऱ्य...

खीर..मोदक..रोट..मलिदा..अन् चोंगे..

Image
   बाप्पांचे आगमन म्हणजे आम्हा सर्व बालगोपाळांसाठी पर्वणी असायची. घरातल्या दिवळीत बाप्पांचे पाच दिवस वास्तव्य असायचे. कालांतराने माझ्या पुस्तकांच्या दरवाजा नसलेल्या कपाटातील पहिला कप्पा बाप्पांसाठी राखीव झाला. आदल्या दिवशीच हरळीकरांच्या रंगाच्या दुकानातून रंग आणून तो रंगवत असू. पुढे कित्येक वर्षी रंगाऐवजी वायचळच्या दुकानातून रंगीत गोटीव ताव, वेगवेगळ्या रंगांचे, चमकदार कागदांच्या आणि पुठ्ठा, थर्माकोलच्या सहाय्याने खास बाप्पांसाठी आरास करण्यात मी गुंतलेला असायचो. सुंदर रांगोळी काढायचो.    साक्षात गणेशाचे आगमन झाले तरीही संध्याकाळपर्यंत सजावट ही सुरुच राही. आईने खपली गव्हाची खीर, मोदक, आळुच्या वड्या, पापड, हळद घालून केलेला पिवळा भात असे पदार्थ बनवलेले असत. मी या कामात आईला त्यावेळी मदतही करायचो. खरे तर या गोड-धोड पदार्थांच्या रेलचेलीमुळेच बालपणी बाप्पांचा उत्सव मला पर्वणी असायचा.    संध्याकाळी खास आरतीच्या निमित्तानं मित्र-मंडळी जमत. चिरमुरे-बतासे-खोबऱ्याबरोबर प्रसाद म्हणून खीर, मोदक आणि तोंडी लावायला चविष्ट आळूची वडी ठरलेली असे.  मग, आरतीसाठ...

मनाला हूरहूर लावणारी "ती" पत्रे..!

Image
  "डाकिया डाक लाया..! खुशी का पैगाम लाया कहीं.. कहीं दर्दनाक लाया..!" किशोर कुमार यांनी गायलेले आणि राजेश खन्नावर चित्रित हे गीत  नव्वदच्या दशकात टी व्ही वर खास करुन जाहिरातीत कधी- कधी 'रंगोली' मध्ये पाहिलेलं आजही आठवतय. जाहिरात तशी फेमस होती. अगदी मनात रुतून ओठांना गुणगुणायला लावणारी! त्या आधी अमीन सयानीच्या आवाजातील बिनाका आणि नंतर सिबाका गीतमाला मध्येही ऐकलेलं. घरी रेडिओ नव्हताच. टी व्ही चा पत्ता तर खूपच लांब! पण, गल्लीत याचा पुरेपूर आणि मनसोक्त आनंद घेतलेला.   आज हे सगळं आठवताना १५ पैशाच्या मनाला हूरहूर लावणाऱ्या पोस्ट कार्डची खाकी छबी, तर निळ्या रंगाच्या अंतर्देशीय पत्रामधील खुशालीचा मजकूर समोर येतोय. मला आजही आठवतय  सैन्यातून सुट्टीला आलेले माझे मामा अर्थात 'अभ्यास अण्णा' हे आमचा अभ्यास घ्यायचे. ते खूप अभ्यास करायचे म्हणून त्यांचे नाव अभ्यास अण्णा पडलेले असे नंतर त्या नामाभिधानाचा शोध लागला. माझ्या लहानपणी ते अभ्यास करताना दिसले नसाले तरी, आमचा अभ्यास मात्र, कडक शिस्तीत घ्यायचे. जयसिंगपूर नगर परिषदेच्या ग्रंथालयातून पुस्तके आणून ते नेहमी वाच...

चटका

माझ्या गावापासून वीसएक किलोमीटरवर इचलकरंजी हे गाव आहे. मी त्यावेळी बीएडला होतो. मला आजही आठवते. तो कॉलेजचा पहिलाच दिवस होता. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वत:ची ओळख करून देण्यासाठी पाच मिनीटे देण्यात आली होती. जेमतेम पाच फूट उंची, एकशिवडी देहयष्टी, काहीसे मळलेले, चुरगळलेले, कपडे आणि डाव्या पायाने लंगडत चालणारा एकजण समोर उभा होता. “मी विजय घोडके ! मंगळवेड्याचा..अं..” बोलताना तो कधी खिश्यात हात घाली. तर कधी दोन्ही हातांची बोटे एकमेकात मिसळे. दिलेला पाच मिनीटांचा अवधी निसटून जात असतानाच आणखी काय बोलायचे ? हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.  एकाएकी आठवल्यागत करून तो म्हणाला, “दामाजीपंत तुम्हाला माहीत असतीलच..ते माझ्याच..म्हणजे मी त्याच गावचा..मंगळवेढ्याचा..” आणि त्याची पाच मिनीटे संपली. ‘बिदरच्या बादशहाच्या काळात मंगळवेढ्याचे तहसिलदार असणाऱ्या दामाजीपंतांनी दुष्काळात होरपळणाऱ्या आपल्या जनतेसाठी शिक्षेची पर्वा न करता, सरकारी धान्याचे कोठार उघडून दिले. इतकेच या निमित्ताने आठवले. मात्र, साक्षात पांडूरंगाने विठू महाराच्या रूपात बादशहाकडे जावून, सहाशे खंडी धान्याचे एक लक्ष वीस हजार मोहर...

मोडीत निघालेल्या मोडीची वाढतेय गोडी

Image
बाराव्या शकतकापासून सुरू झालेली राज दरबारातील मोडी लिपी 1960 नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली. परंतु, याच मोडीची गोडी पुन्हा एकदा वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेत ऑनलाईन मोडी शिकण्याकडे आणि शिकवण्याकडे कल वाढल्याचेही दिसून येत आहे. महाराष्ट्रात सुमारे 12 व्या शतकापासून मोडी लिपीची सुरूवात झाली असे इतिहासकारांचे मत आहे. श्री. हेमाद्रीपंत ते या लिपीचे जनक होते. न मोडता, न थांबता अत्यंत जलद गतीने लफ्फेदारपणे झरझर लिहील्या जाणाऱ्या लिपीस मोडी असे म्हणतात. यादव काळापासून सुरू झालेला हा प्रवास शिवकाळात बहरला होता. या लिपीचा सर्रास वापर राजदरबाराबरोबरच लोकांच्या दैनंदिन जीवनात 20 व्या शतकाच्या अखेरपर्यंत होत असे. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळात 1960 पर्यंत तिचा समावेश शिक्षणात होता. परंतु, छपाईच्या दृष्टिने तिची मर्यादा लक्षात घेवून काळाच्या ओघात ही मोडी लिपी मोडीत निघाली. मोडी लिपीचा प्रसार आणि प्रचार शिवकाळात झाला. आजही शिवकाळातील व पेशवाई काळातील कागदपत्रे पाहिली तर बहुसंख्य कागदपत्रे ही मोडी लिपीतूनच असल्याचे दिसून येते....

बळी

उशाला दंडोबाचा डोंगर, पायाशी कावडीचा डोंगर, पुढे शुक्राचा डोंगर. अशा या डोंगर रांगांमधून विस्तीर्ण पसरलेल्या जाखाईच्या पठारावर वाड्या-वस्त्यांनी आपल्या पथाऱ्या पसरलेल्या. दिवस कासराभर वर आला होता. रखरखीत ऊन आग ओकीत होतं. अंगाची नुसती ल्हाई उडत होती. कुठंतरी गारव्याला बसून राहावसं वाटत होतं. अंगणात बसून, सारखं शेपटी उडिवणाऱ्या बोक्याबरोबर राम्या खेळत होता. जोरात शेपटी ओढताच ‘फिस’ करून तो राम्याच्या अंगावर गेला.  “हत..भोसडीच्या माझ्या अंगावर येतोस, थांब कापतोच तुला.” असं म्हणत राम्या त्याच्या मागे गेला. तसं बोक्याने लगेचच समोरच्या भिंतीवरून उडी  टाकली  आणि तो पसार झाला. हातभर लांब जिभ बाहेर काढून मोत्या कुत्रं सारख ‘ह्या-ह्या’ करत धापा टाकत बसून होतं. आता राम्या त्याच्याकडे वळला होता. कुत्र्याच्या पाठीवर उलटा बसत तो त्याच्या आधिच वाकड्या असणाऱ्या शेपटीला चिंधीचा गोंडा बांधत बसून होता.  चहाचं काळं कढूत पाणी ढोसून शिरपानं गोठ्यातली बैलजोडी सोडली, ‘चलतो..गं..’ म्हणून एकवार त्यानं बायकोला सांगितलं आणि तो रस्त्याला लागला. तशी ती धावत बाहेर आली. उंबऱ्याला रेटा देत आतूनच म्हण...

इंडिया टुडे अन् दोज डेज

Image
    एकलम खाजे.. है..शा. दुब्बी राजे..है.. शा. तिरान भोजे.. है..शा. चारी चौकटी..है..शा..पंचम पांडव..है..शा..या आरोळ्यांमध्ये सगळे रश्शी खेचताहेत आणि रंगमंचकावरील पडदा बाजूला होतोय..हळूवार पसरत जाणाऱ्या स्पाॕट लाईटमध्ये पांढऱ्या रंगाच्या नेहरु शर्ट आणि तुमानीत निवेदक अवतरतो..       "१५ आॕगस्ट १९४७ ! भारताच्या इतिहासातील सोनेरी दिवस ! हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. काही फासावर लटकले तर, काहिंनी इंग्रजांच्या बंदुकीच्या गोळ्यांनी भारतमातेस आपल्या रक्तांनं न्हाऊ घातलं. रक्त मातीत मिसळलं. मातीचं सोनं झालं. इंग्रज हिंदूस्थानातून निघून गेले. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला. स्वतंत्र भारतात लोकशाही नांदू लागली. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य लोकराज्य ! स्वतंत्र भारतातील नागरिक मोठ्या अभिमानानं आपली प्रतिज्ञा गाऊ लागला..!       इयत्ता आठवी आणि नववीला असताना श्री तुकाराम मोरेसर आणि श्री विवेक स्वामीसरांनी "इंडिया टुडे" ही जीवनकुमार शिंदे लिखित एकांकिका बसवली. भरत पाटील, शांतीभूषण तेरदाळे, समीर नानीवडेकर, शेखर गंगधर, संजय जि...

लावण्यखणी...लावणी..!

Image
ढोलकीवर थाप पडली आणि पायातले घुंगरू वाजू लागले.. प्रेक्षकांनीही कळत-नकळत ठेका धरला.. "लावण्यखणी"ची वेल सर्वत्र पसरली..संपूर्ण वातावरण लावणीमय झालेले..अन.. समोर महिला प्रेक्षक असूनही चक्क शिट्ट्यांची बरसात सुरू होती. उधाणलेल्या रसिक प्रेक्षकांकडून रुमालांची उधळण होत होती. हे यश होतं ज्योती जोशी  यांच्या अदाकारीचं..‘लावणीचं!’ तेही जयसिंगपूर सारख्या परिसरात..! जायंटस् ग्रुप, सहेलीच्या तत्कालीन अध्यक्ष माधुरी चौगुले यांच्या सोबत 2007 साली खास महिलांसाठी विशेषत: सहकुटुंबियांनी लावणीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा या हेतूने ज्योती जोशी हिच्या लावण्यखणी या शोचे आयोजन केले होते. हा लेख लिहीताना बीएला मराठी वाङ्मयाचा अभ्यास करताना तंत, पंत आणि संत साहित्यावरील प्राध्यापक ए.टी. चौगुले यांनी दिलेल्या नोट्स फडताळातून शोधून काढल्या. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठात जर्नालिझमला असताना लेखक नामदेव व्हटकर यांच्या पुस्तकावर संदर्भित आणि तत्कालीन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे, मार्गदर्शित सादर केलेला परिसंवादासाठीचा लघु शोधनिबंध  शोधून काढला. यावर आधारित त्यातील काही अंश ...

आठवण..एका जन्माची..पुनःजन्माची..!

Image
* मृत्यूच्या दाढेतून सहिसलामत बाहेर पडून उद्या बरोबर आठ वर्षे होतायेत...होय तब्बल आठ वर्षे सरली. पहिली एक-दोन वर्षे केवळ आठवणीने अंगावर काटा शहारायचा पण, काळ हा सर्वांवर जालीम औषध आहे..तसे म्हणाल तर उद्या माझा दुसरा वाढदिवसच..!*   *२१ जून २०१२ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांकडे एका बैठकीच्या निमित्ताने   मंत्रालयातील 6 व्या मजल्यावर तत्कालीन संचालक प्रल्हाद जाधव, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे आणि सध्याचेही जनसंपर्क अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे, तत्कालीन आणि सध्याचे उप मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख, विशाल ढगे, तत्कालीन गृहमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी किशोर गांगुर्डे, माझे सहकारी निवृत्त अधिकारी हेमंत खैरे आणि मी असे सगळेजण एकत्र होतो. आता बैठक सुरू होणार, इतक्यात मंत्रालयाला आग लागल्याचे समजले.* *सुरूवातीला आगीची भीषणता फारशी जाणवली नाही. किरकोळ आग असावी आणि ती विझवली जाईल अशा विचारात आम्ही सगळेजण निवांत होतो.  त्यानंतर मात्र, आम्ही सगळे एकत्र असणाऱ्या दालनालाच धुरांनी वेढले आणि बाहेर दबा...