_ये उन दिनों की बात है..._
किस्सा पहिला - *_Pacific - The Unsung Hero_* १०वी पर्यन्त मी असा काही खूप हुशार वैगेरे नव्हतो, वडील शिक्षक, आणि आई वडिलांचे न पटल्याने माझ्या लहान पणीच आई वडील विभक्त झाले अशा कौटुंबिक पार्श्वभूमी मुळे मी मात्र थोडा बुजरा च बनलो होतो. बघता बघता १० वी संपली. सावत्र आई आणि घरी आम्ही ७ लोक खाणारे त्यामुळे, सहसा माझ्या वर घरकाम तसेच भावंडाना सांभाळणे ही जबाबदारी असायची मध्यम वर्गीय कुटुंब असल्याने माझा बराच वेळ हा रेशन आणि रॉकेल च्या लाईन मध्ये जायचा बघता बघता बहिणींची लग्न झाली व आता लक्ष माझ्या वर केंद्रित झाले, ११वी मध्ये सायन्स घेतले आणि मी मुकुंद, राजू, अतुल, किरण, अनंत, संतोष असे सर्वजण एकत्र झेले ज्यू. कॉलेज मध्ये ११ वी सायन्स ला एडमिशन घेतली. परंतु घरातूनच मिळणारे डोस आणि जबाबदाऱ्या ( वर नमूद केलेल्या) या मुळे सायन्स हा विषय दुरापास्त वाटू लागला व १२ वी मध्ये ड्रॉप घ्यावा लागला. याचे खापर अखेर माझ्या वरच फोडत घरच्यांनी *_"कमवा व शिका"_* योजने अंतर्गत पुढील शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. आता डोळ्यांसमोर दोन च पर्याय उपलब्ध होते शिक्षण बंद करणे किंवा आर्ट्स घेऊ...