कोकण-गोव्याच्या सीमेवरील सांस्कृतिक लेणं: लाल मातीत रुजलेला 'धालोत्सव'
_*श्री धालो गे बाई..धाल्याने खेळूया..*_ *_गे बाई धाल्याने खेळूया.._* *_पिपळ पेटला पाऱ्यारं..पाऱ्यारं_* *सावरं रंभे घरदारं.._* _*वारो व्हावता जळीमळी जळीमळी..*_ *_पावस पडता झिळीमिळी झिळीमिळी.._* *_वारो व्हावता जळीमळी जळीमळी.._* *_पावस पडता झिळीमिळी झिळीमिळी.._* *_पायात घातले कडे तोडे कडे तोडे_* *चल गे रंभे पुढे पुढे..* *_आयल्यान गाठी पहिल्यान गाठी निसरगाठी सवता गे..ss निसरगाठी सवता गे..ss_* निसरगाठी सवता..ss निसरगाठी सवता..ss *प्रशासन अधिकारी गितांजली नाईक यांनी ठेवलेला धालोत्सवाचा हा स्टेटस पाहिला. लयबध्द तालातील मालवणी, कोकणी सुरावटीचा लोकगिताचा हा बाज मला माझ्या सिंधुदुर्गातील आणि गोव्यातील वास्तव्यात घेवून गेला. गोवा कार्यालयाचा पदभार असतानाच सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी पदाचाही माझ्याकडे अतिरिक्त पदभार होता. त्यावेळी इथल्या लोकपरंपरा, लोकसंस्कृती जवळून जाणून घेण्याचा योग आलेला. गोव्यामधील साळ गावचे गडे असोत वा सावंतवाडी-गोवा सीमाभागातील 'धालो'..! सुरेल लोकगीतांच्या लयीच्या लोकपरंपरेचा, लोकसंस्कृतीचा गोडवा आपसूकपणे मनात झिरपत गेलेला. लिहीन लिह...