Posts

Showing posts from August, 2016

ज्या विहिरीत टँकर ओतला वेळूची ती विहीर जलयुक्तने झाली तुडुंब..!

Image
ज्या विहिरीत टँकर ओतला वेळूची ती विहीर जलयुक्तने झाली तुडुंब..! टंचाईग्रस्त म्हणून ओळखल्या जाणा-या कोरेगांव तालुक्यातील वेळू गावातील सार्वजनिक विहिरीमध्ये टँकर ओतून या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जात असे तीच विहीर आज गावात झालेल्या जयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामांमुळे तुडुंब भरली आहे. वेळूच्या शिवारात जागोजागी पाणी खेळले आहे. सध्या सुरू असणा-या पाझर तलाव जोड प्रकल्पाने गाव निश्चितच टँकरमुक्त झालेले असेल. अवघ्या 1511 लोकसंख्येचे वेळू हे गांव या गावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत आणि श्रमदानातून मोठया प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून या गावात सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धाही घेण्यात आली. 445 कुटुंब संख्या असणा-या या गावात 311 शोषखड्डे तयार करण्यात आले. मनुष्यबळाव्दारे 924.31 घनमिटर सीसीटीचे काम तर 17 हजार 670 घनमिटर डीप सीसीटीचे काम यंत्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 6 गॅबीएन बंधारे, 29 माती नालाबांध, कंपार्टमेंट बंडींग त्याचबरोबर खोलीकरण रुंदीकरण पाणीसाठा गाळ काढणे, विहीर पुनर्भरण आणि शेततळी यांचा य...