Posts

Showing posts from February, 2023

"विल्सन" सातपुते..अन् वर्गातील "चांदणे"..!

Image
    बहुधा मी १२ वीला असेन. सुरुवातीला मी वाणिज्य शाखेला होतो. पुढे मी कलाशाखेतून (वाणिज्य 😃😜 न झेपल्याने) पदवीधर झालो तो भाग वेगळा.😉   जयसिंगपूर महाविद्यालयात संजय जिरगे, गुरुदास पवार, विनोद घाडगे, संदीप पाटील, शेखर गंगधर, रफिक शेख, विजय देसाई अशी दिग्गज विद्यार्थ्यांसोबत मी एक गरीब बिचारा(😜) होतो.    गंमत अशी, कोण कला शाखेला तर कोण वाणिज्य शाखेला असूनही आम्ही सगळे एकाच वर्गात एकाच प्राध्यापकाच्या वर्गात बसत असू. कशाला ते वेगळे सूज्ञांस सांगायला नको.(तेवढी अक्कल हुशारीच आमची😄)     अक्षरशः लहान मुलांच्याप्रमाणे प्राध्यापकांकडे एकमेकांच्या तक्रारी करत असू. यात अगदी यानं मला डिवचलं सर, यानं मला मारलं यांचा समावेश असायचा.(अजूनही वेगवेगळ्या तक्रींचा सूर यात होताच.😁) वर्गात अशा तक्रारी करुन प्राध्यापकांची खेचा खेची करण्यात जो तो पुढे असायचा.    यात आमचे जिरगेअण्णा चतूरच! सरांनी चिडून एखाद्याचे नाव विचारले तर त्याच्या बापाचे किंवा त्यावेळी जे आठवेल ते सांगत असू. मग ते सर त्याच नावाने काॕलेजकुमारला वर्गात हाक मारायचे आणि सगळा व...