जुगलबंदी..तिही खरतालची ढोलकशी..!

      
    मी काही दिवस राजस्थानच्या दौऱ्यावर होतो. जेव्हा परत आलो, त्यावेळी राजस्थानहून काय आणलं? हा पहिला प्रश्न मित्रमंडळींनी सहजतेने विचारला. तेथे काय पाहिलं? हा दुसरा प्रश्न सुलभतेने विचारला. मानवी स्थायीभावाप्रमाणे हे दोन्ही प्रश्न स्वाभाविक आणि अपेक्षितच आहेत.
        या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देताना मी म्हणालो, तेथे कला, पाहिली, कलाकार पाहिले, किल्ले-राजवाड्यांचे वैभव पाहिलं आणि जैसलमेरमधील अप्रतिम असे सौंदर्य पाहिले. तसं म्हटलं तर आज जगातील हव्या त्या गोष्टी आॕनलाईन मागवता येतात. पण मूळ राजस्थानी कलाकारीच्या त्यातही बिकानेरमधील 'राष्ट्रीय उंट संशोधन केंद्रा'मधून 'वाळवंटातील जहाज' असणाऱ्या,   उंटापासूनच्या काही भौतिक वस्तू सोडल्या, तर तेथील कलाकारांची समाधानी वृत्ती, पर्यटकांविषयी असणारी आदरातिथ्याची भावना, अद्भूत कलाकारी, 'वाळवंटासारख्या मरुभूमीतही 'समाधान..सुख..जीवन' याची हिरवळ शोधून जोपासणाऱ्या वृत्तीची ऊर्मी मी सोबत आणल्याचे आवर्जून सांगितले.
           या दौऱ्यात प्रत्येक अनुभव हा नैसर्गिक सौंदयाइतकाच विलोभनीय होता. तो मी तेथूनच लिहायला सुरुवात केली आहेच. आज मी  जैसलमेरमधील पाहिलेल्या जुगलबंदीविषयी सांगणार आहे.
          जुन्या मराठी चित्रपटात विशेषतः तमाशाप्रधान चित्रपटात सवाल-जवाब पाहिला आहे. अनेक संगीत मैफिलीत वाद्यांची मैफिलही सजलेली पाहिली. पण, 'खरताल' हे वाद्यच मुळी माझ्यासाठी नवीन त्याची जुगलबंदी ढोलकबरोबर अनुभवली ती जैसलमेरमध्ये!
      जैसलमेरमध्ये सायंकाळी स्थानिक कलाकार आपली पारंपरिक कला विशेषतः घुमर आणि आगीचे खेळ जिवावर उदार होवून पर्यटकांना दाखवतात. यात मुलीही मागे नाहीत. अगदी डोळ्याने सुई उचलणेसारखा धाडशी प्रयोग दाखवतात. असो त्यावर स्वतंत्र लिहू.
       शिसम लाकडाच्या दोन साध्या पट्ट्या म्हणजे 'खरताल' हे वाद्य होय. पसरट सपाट आणि अगदी तळहातात मावेल, इतक्या आकाराचे. या खरतालाची ढोलकबरोबर जमलेली संगीत मैफिल उपस्थितांच्या कानांना वेगळी अनुभूती देवून तृप्त करणारी ठरली. 'दिल बेहद खुश हुआ..' अशीच काही प्रतिक्रिया मग उपस्थितीतांकडून मिळत होती. अगदी लहान लहान होत जाणारा लय-तालाचा सूर हे याचे कौशल्य! गंमत म्हणजे दोघाही कलाकारांची नावे सारखीच, मेहबूब खान!
        आजवर पाहिलेल्या जुगलबंदीतला हा मेहबूब खान विरुद्ध मेहबूब खानची अर्थात साध्या लाकडी पट्ट्यांची खरतालची अनुभवी कसलेल्या दिग्गज ढोलकबरोबरच्या जुगलबंदीचा वेगळा अनुभव कलाकारांच्या मरुभूमीत पहायला मिळाला.
                             - प्रशांत सातपुते
                    p7sons@gmail.com             
                         9403464101
    https://m.facebook.com/story.php?story_fbid=4508258895886300&id=100001067020937

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..