मासिक पाळीचा कप अर्थात पर्यावरणपूरक Wom Safe Mentrual Cup..

     लहानपणी घरातील स्री बाहेरच्या खोलीत बसलेली आसायची. तिला देवाघरात, स्वयंपाक घरात येण्यास मज्जाव आसायचा. इतकेच काय तर चुकून सुध्दा तिला स्पर्श न करण्याची आम्हाला ज्येष्ठांकडून तंबी असायची. याबाबत अधिक विचारणा केल्यास, 'तिला कावळा शिवलाय' हे ऐकायला मिळायचं. थोडा कळता झाल्यावर 'शिवाशीव झालीय' असे शब्द कानावर यायचे.
      ६५ व्या जाहिरातीच्या कलाविश्वात 'MC' अर्थात 'महिने का चक्कर' समजून आले. आतापर्यंत Stayfree, whisper बिनदिक्कतपणे जाहिरातीच्या माध्यमातून झळकून पुढे सरकत होते.
      एकेकाळी घरातल्या स्री च्या होणाऱ्या व्यथेला जाहिरातीतून वाचा फूटली होती. Information, Education & communication यानेही जोर धरला होता. काळ बदलला. अक्षयचा 'पॕड मॕन' आला. साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात याच ' पॕडमॕन' ला आणून या विषयाला आधिक समाजाभिमुख करण्याचा एक सुंदर प्रयत्न झाला. या सामाजिक चळवळीत घरच्या  पुरुषालाही अधिक सजगतेने सहभागी होण्यासाठी प्रेरित केले गेले.
        मासिक पाळीसाठी सुरुवातीला जुन्या-पुराण्या कपड्यांचा वापर होत असे. नंतर ते कंपन्यांनी आकर्षक वेष्टनात पॕडच्या रुपाने आणले.  कित्येक बचत गटाच्या महिला यात उतरुन त्याची निर्मिती करु लागल्या.
      याच्या वापरानंतर खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा प्रश्न काही ठिकाणी निर्माण होवू लागला. अस्ताव्यस्त कुठेही पडणारे दृश्य नवीन नाहीत.
       माझी दहावीपर्यंतची वर्गमैत्रिण मनीषा घेवारी-चौगुले हिचे पती पुरुषोत्तम घेवारी यांनी 'विश्वकर्मा एन्टरप्राईजेस' मध्ये "Wom Safe Mentrual Cup" ची निर्मिती केलीय. तसा हा विषय माझ्यासाठी नवा होता,पुरुषोत्तम आणि मनीषा या दोघांशी चर्चा करताना असं लक्षात आलं की 24 December 1884 Patented आहे.
        सर्वात महत्त्वाचे म्हणजे  हा कप प्रदूषण विरहीत आणि खर्च वाचवणारा आहे. हा कप १० वर्षे पुन्हा पुन्हा धुवून-निर्जंतुकीकरण करुन वापरता येणारा आहे.
     याचे उत्पादन पुण्यानंतर जयसिंगपुरात होतय. ही आपल्यासाठी महत्त्वाची बाब आहे. आपल्या गृहिणीसाठी याचा अधिकाधिक वापर व्हायला हवा. त्यासाठी गृहिणीबरोबरच आता घरच्या पुरुषालाही 'पॕडमॕन' भूमिकेतून 'कपमॕन' व्हायला काय हरकत आहे..!
     अधिक माहितीसाठी- www.womsafemc.com, customer care - 8275759185 वर संपर्क करावा.
 
 --- प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, 
कोल्हापूर
9403464101 
 p7sons@gmail.com
 https://www.facebook.com/prashant.satpute.988
000000

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..