"क्षणाची पत्नी अनंत काळाची माता तू..पुरूषप्रधान संस्कृतीत नुसतीच भारतमाता तू..!"
महिला दिनानिमित्त औद्योगिक न्यायालयातील महिलांचा सन्मान
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला कार्याचा वसा आणि वारसा रस्त्यावरील दगड फोडणाऱ्या, ऊस भरून बैलगाडी हाकणाऱ्या महिलेपर्यंत पोहचवणं हे जास्त महत्त्वाचे आहे. आजही शिकलेली आमची सावित्रीची लेक व्रतवैकल्यं, उपास-तापास यातच अडकलेली दिसतेय. तीनं आता बदलायलाच हवं..सुरुवात करायलाच हवी. नव्या पिढीची, नव्या धैर्याची सावित्री बनायलाच हवी..
शनिवारी औद्योगिक न्यायालयाच्या न्यायाधीश समीना खान मॕडमचा फोन आला. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं न्यायालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहा म्हणून. खरंतरं महिलांच्या कार्यक्रमाला महिला व्याख्याती पाहुण्या बोलवाव्यात असं मी सुचवलं होतं. पण, मॕडम तुम्हीच या आणि मार्गदर्शनही करा, असं त्या म्हणाल्या.
काय बोलायचं असा थोडा प्रश्न होताच. तयारी फारशी करताही आली नाही. आज तसा दिवसभर व्यस्तच होतो. सकाळी सौ. ला शुभेच्छा देतानाच एक मुक्तछंदातील कविता केली. चला म्हटलं आज हीच वाचून दाखवू. अभिनेत्री दीव्या दत्ता हिचा भाऊ डाॕ. राहूल दत्ता यांचीही एक आशयपूर्ण कविता वाचनात आली.
आजच्या कार्यक्रमात औद्योगिक न्यायालयातील सुनिता कृष्णात बुवा, चैत्राली बबन कोरवी, मनस्वी दिग्विजय लिंगडे, तेजस्विनी प्रदिप शिंदे, शोभा संजय कडू, उज्वला नारायण भारती, विनीता नागराळे या महिला कर्मचाऱ्यांचा महिला दिनानिमित्त रोप आणि भेटवस्तू देऊन माझ्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी औद्योगिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती समिना ए. खान, कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती अर्चना जी. बेहरे उपस्थित होत्या.
"अर्ध जग महिलांचं असं म्हणतात. तर उर्वरित अर्ध जग महिलांपासूनचं असतं, ‘ती’ असते सुरूवात आणि ‘तीच’ असते सर्व काही, तिच्या पलीकडे काही नाही, तिला सन्मान द्यायला पाहिजे या मागणीपेक्षा तिला सन्मान मिळत आहे, ही सन्मानपूर्ती ऐकायला यायला हवी. "पुलं"ना एकदा विचारण्यात आलं होतं, तुमचा पुनःजन्मावर विश्वास आहे का? असेल तर पुढच्या जन्मी तुम्हाला काय व्हायला आवडेल? विनोदी मनाच्या "पुलं"नी इथे मात्र गंभिरतेने उत्तर देत, मला सुनीता व्हायला अर्थात माझ्या पत्नीचा जन्म पुढच्या जन्मी अनुभवायला आवडेल असं सांगितलं होतं आणि सुनिता देशपांडेंनी "पुलं" व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली होती.
मी कवितेला जन्म दिला म्हणजे मी तिचा बाप झालो आणि कवितेने मला "कवी" म्हणून जन्माला घातलं म्हणून ती माझी "आई" झाली, असं साधं-सरळ जीवनाचं तत्वज्ञान कवी जगदीश खेबुडकर यांनी मांडलेलं होतं.
या दोन्ही उदाहरणांचा मी मुद्दाम उल्लेख करतोय ते "बाईपासून आईपर्यंत" प्रवास झालेल्या स्त्री ची महती अधोरेखित करण्यासाठीच!
"बा" या अक्षराचा अर्थही गुजरातीमध्ये आई असाच होतो. जरी आई होता नाही आलं तरी आईचा जन्म घ्यायला आवडेल.. एवढं नक्की!
आजच केलेली स्त्री व्यथा मांडणारी 'ती' कविता इथे देत आहे.
तू गर्भात येतानाच सुरु झाला तुझा संघर्ष..
अग्निपरीक्षा तू तेव्हाही दिलीस..
आतातर ललाटरेषा उमटण्याआधी तुझी धडपड केवळ अस्तित्वासाठी..
डोळस असूनही गांधारी बनलीस..
पुरुषी अहंकारासमोर, बधीर बनलेल्या मेंदूंसमोर वस्त्रहरणाला सामोरी गेलीस..
तुझा तुझ्या शरिरावरही हक्क उरला नाही..तू पांचाली बनलीस..
बाई गं निर्मात्यालाही जन्म देणारी तू परंपरेची विटाळ ठरलीस..
तू जगदंबा तू भवानी विद्येची तू साक्षात सरस्वती..
परंपरेच्या शृ़ंखला तोडण्या आली फातिमा अन् सावित्री..
तुझा हा लढा पुरुषी दांभिकतेचा, समानतेच्या वल्गनतेचा..
विखारी नजरेने आजही होतय तुझं वस्रहरण..
क्षणाची पत्नी, अनंत काळाची माता तू..
पुरुषप्रधान संस्कृतीत नुसतीच भारतमाता तू..
डाॕ राहूल दत्तांची कविताही अशी आहे-
तुमने कहाँ था हम एक ही है, तो अपने बराबर कर दो ना
नॕपी जब मैं बदलती हूँ, तुम दूध की बोतल भर दो ना
बस यूँ ही एक है एक है करके कहाँ जिंदगी चलती है
कभी तुम भी सर दबा दो मेरा ये भी कमी एक खलती है..
जब मैं भी आॕफिस जातीं हूँ, तुम भी घर को सवाँर दो ना..
तुम ने कहाँ था हम एकही है, तो अपने बराबर कर दो ना..
मत करों वादें जन्मों के, इस पल खुशी की वजह दो ना..
कभी बाजारों से ध्यान हटें तो मकाँ को घर भी कर दो ना..
आओ पास बैठो कुछ बातें करे, कभी दिल की जख्म भी भर दो ना..
क्यूँ कहना भी पडता है, तुम एहसासों को समझों ना..
तुमने कहाँ था हम एकही है,तो अपने बराबर कर दो ना..
तुम क्रिकेट भी अपनी देखो और मैं सिरियल अपना भी लगाऊँगी..
तुम थोडा हात बटाँ देना जब मैं किचन में जाऊँगी..
सब मिलकर साथ करने की हम में ये भी तो क्वालिटी है..
हम साथ खडे है एक दुजे के हल ही जेंडर इक्वालिटी है..
तुम भी नये से हो जाओ अब और नये से मुझ को उमर दो ना..
तुमने कहाँ था हम एकही है तो युँही जीवन बसर दो ना..
she askes him, "why do you always create A common man..why not a Common Woman??"
And he smiled & said," Yoy see, woman can never be common!!"
न्यायाधीश श्रीमती खान यांनीही यावेळी स्त्री-पुरुष अशी तुलना, पुरूष आणि स्त्री असा भेदभाव न करता एकसमान पहायला हवे. किंबहुना स्त्री ही पुरूषाच्या एक पाऊल पुढे आहे. ती सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. घरची जबाबदारी सांभाळून नोकरी सक्षमपणे करत आहे. असा संदेश देत कवितेचे वाचन केले. या छोटेखानी कार्यक्रमात काव्यमैफील काही काळ आज जमून आली होती.
न्यायाधीश श्रीमती बेहरे यांनीही यावेळी कौतुकास्पद कार्यक्रम केल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या.
वकील प्रतिभा भोसले-निंबाळकर यांनी सूत्रसंचालन करताना सत्कारमूर्तींचा जन्मदिनांक, गावापासून आजवरचा खडतर प्रवास आणि या प्रवासात दोन्ही घरची जबाबदारी, विविध भूमिका सांभाळताना झालेली कसरत प्रकर्षाने मांडली मांडली. या कार्यक्रमास महिला आणि पुरूष वकील तसेच कर्मचारी उपस्थित होते.
- प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी,
कोल्हापूर
9403464101
p7sons@gmail.com
https://www.facebook.com/prashant.satpute.988
000000
Comments
Post a Comment