महाराणांचे वंदनीय "प्रताप" धोरण
जगात चीनच्या विशालकाय भिंतीनंतर दुसरा क्रमांक लागतो तो कुंभ्भलगड किल्ल्याच्या संरक्षण भिंतीचा. अशा विशालकाय किल्ल्यावर ९ मे १५४० रोजी युगपुरुष महाराणा प्रताप यांचा जन्म झाला. मेवाडचे महाराणा उदयसिंह यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. १५७२ मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. १८ जून १५७६ मध्ये मुघल बादशहा अकबर च्या सैन्याबरोबर हल्दीघाटीत घनघोर युद्ध झाले.
हे युद्ध म्हणजे सांप्रदायिकतेचे युद्ध नव्हते. तर आत्मसन्मान, मातृमूमीची स्वतंत्रता व स्वाधिनतेचा संघर्ष होता. याचे प्रमाण म्हणजे अकबरच्या सैन्याचा सेनापती जयपूरचे "कुँवर मानसिंग" होते. तेथेच महाराणा प्रताप यांच्या सैन्याचे सेनापती काबुलचे "हाकीम खान सूर" होते.
ज्या बेहरम खानने अकबरला दिल्लीचा बादशहा बनविले, त्याच बेहरम खानचा मुलगा अब्दुल रहीम खान-ए-खाना हा बादशहाचा विश्वासू होता. तो अजमेरचा सुभेदार होता. खान-ए-खान शिवपूरमध्ये असल्याचे समजल्यावर महाराणा प्रताप यांचे पुत्र कुँवर अमरसिंह यांनी मुघल सैन्यावर हल्ला चढविला. यात खान-ए-खानाच्या प्रांत, संपत्तीबरोबरच त्याचा जनानखानाही हाती मिळाला. हा जनानखाना कुँवर ने महाराणा प्रताप यांच्यासमोर सादर केल्यावर, ते संतापले. "आपले शत्रूत्व कोणत्याही नारीविरुद्ध नसून, मातृभूमीच्या विरोधकांशी आहे. या नारी म्हणजे आई-बहिणीसमान आहेत. त्यांची सन्मानाने त्यांच्या तळावर रवानगी करण्याचा आदेश त्यांनी दिला."
कुँवर अमरसिंह यांनी खान-ए-खानाच्या जनान्याची सन्मानाने पालखीतून खानाकडे पाठवणी केली.
महाराणा प्रताप यांच्या जन्मानंतर सुमारे ९० वर्षापुढे जन्मलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेच्या राज्यकारभारातही असाच प्रसंग आपल्याला दिसून येतो. अशा या युगपुरुषाचे १९ जानेवारी १५९७ मध्ये निधन झाले.महाराणा प्रताप धन-दौलतीपेक्षा जास्त मान-सन्मानला विशेष महत्त्व द्यायचे. त्यांच्या याच विचारांविषयी मुगल दरबारातील कवी अब्दुर रहमान ने लिहिले आहे,''दुनिया में एक दिन सब खत्म हो जाएगा धन-दौलत भी खत्म हो जाएगी लेकिन इंसान के गुण हमेशा जिंदा रहेंगे।''
©️प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com
9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4752130668165787&id=100001067020937
सुंदर सादरीकरण, प्रवाही लेखन, वहात रहा.
ReplyDeleteजय एकलिंगजी