सात कापी चुणाची घावणे..

     
उसळ घावणे, घावणे चटणी, आंबोळी ही कोकणातील विशेष खाद्यसंस्कृती..! सातकापी चुणाचे घावण, शिरवाळे अन् घावण चटणी हे स्वादिष्ट केवळ उदरभरण नोहे मनतृप्तीचे पदार्थ नाश्त्यासाठी मिळाले. सातकापी घावणाविषयी रात्रीच चर्चा झाली होती आणि सकाळीच केळीच्या पानात पहुडलेले गरमा-गरम घावणे समोर आले.
     एकाच चारकापी घावणात मी पुरता गारद झालो. 😀 जात्यावर दळलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या तांदळापासून बनवलेल्या पिठापासून ही घावणे बनवली जातात. ते ही चुलीवर तापलेल्या बिडाच्या तव्यावर शेकलेल्या-भाजलेल्या घावणांवर "चूण" म्हणजे खोबरं आणि गुळ एकत्र करुन केलेले मिश्रण-सारण त्यावर पसरवले जाते. अशी एकूण सात घावणे एकमेकांवर ठेवली की, ती झाली "सात कापी चुणाची घावणे.!"
       थोडक्यात एकमेकावर रचून ठेवलेली चवडच म्हणा ना.. दोन कापी आणि दोन कापी अशा चार कापी घावणातच मनतृप्ती आणि उदर भरण संपुष्टात आल्याने पुढे केवळ एका घावणे-चटणीचा चव चाखण्याचा सोपस्कार पार पाडून जिभेवर रेंगाळणारा रुचकर गोडवा घेवून ओरोसला मार्गस्थ झालो. ❤️😊 
      (शिरवाळेविषयी स्वतंत्रपणे पुढील भागात..) तोपर्यंत चाळवलेली जिव्हा शांत करण्यासाठी घावणांचा हा प्रयत्न घरी करायला काय हरकत आहे..!
           ©️प्रशांत सातपुते
       p7sons@gmail.com             
                         9403464101
    https://m.facebook.com/story.php?story_fbid=4508258895886300&id=100001067020937

https://youtube.com/channel/UC7xDwWuZw8MjzHiQwoBXLIQ

https://twitter.com/pacific7sons?t=GWKalaL8UylW2MDZf_JYxg&s=08



Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..