_ये उन दिनों की बात है..._
किस्सा पहिला - *_Pacific - The Unsung Hero_* १०वी पर्यन्त मी असा काही खूप हुशार वैगेरे नव्हतो, वडील शिक्षक, आणि आई वडिलांचे न पटल्याने माझ्या लहान पणीच आई वडील विभक्त झाले अशा कौटुंबिक पार्श्वभूमी मुळे मी मात्र थोडा बुजरा च बनलो होतो. बघता बघता १० वी संपली. सावत्र आई आणि घरी आम्ही ७ लोक खाणारे त्यामुळे, सहसा माझ्या वर घरकाम तसेच भावंडाना सांभाळणे ही जबाबदारी असायची मध्यम वर्गीय कुटुंब असल्याने माझा बराच वेळ हा रेशन आणि रॉकेल च्या लाईन मध्ये जायचा बघता बघता बहिणींची लग्न झाली व आता लक्ष माझ्या वर केंद्रित झाले, ११वी मध्ये सायन्स घेतले आणि मी मुकुंद, राजू, अतुल, किरण, अनंत, संतोष असे सर्वजण एकत्र झेले ज्यू. कॉलेज मध्ये ११ वी सायन्स ला एडमिशन घेतली. परंतु घरातूनच मिळणारे डोस आणि जबाबदाऱ्या ( वर नमूद केलेल्या) या मुळे सायन्स हा विषय दुरापास्त वाटू लागला व १२ वी मध्ये ड्रॉप घ्यावा लागला. याचे खापर अखेर माझ्या वरच फोडत घरच्यांनी *_"कमवा व शिका"_* योजने अंतर्गत पुढील शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. आता डोळ्यांसमोर दोन च पर्याय उपलब्ध होते शिक्षण बंद करणे किंवा आर्ट्स घेऊन कमवा व शिका योजना राबविणे ही झाली माझी स्टोरी आता *_प्रशांत सातपुते_* बद्दल थोडस प्रशांत राजीव गांधी नगर मध्ये राहायचा, शाळेमध्ये अतिशय आज्ञाधारक आणि सिन्सीयर विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध, एन. सी.सी. चा सार्जंट होता, इंडिया टुडे नावाच्या एकांकिके मध्ये ही निवेदक म्हणून चांगलीच छाप सोडली होती पठ्ठयाने पण तो पर्यंत त्याची पार्श्वभूमी मला माहिती नव्हती. माझी अंग काठी अतिशय बारीक *मोगली* सारखे उभे राहणारे केस. शनिवारी एन. सी. सी. ची परेड असायची तेंव्हा सर्वजण "आरे तुला बुटं उचलतात का ?" म्हणून चिडवायचे आणि या उलट प्रशांत ढोले सरांचा आवडता आणि सार्जंट (Leader) त्यामुळे माझे त्याच्या सोबत विशेष Interaction होत नसे. असो, पुढे असे झाले की मी नवजीवन कॉलेज ला एडमिशन घेतली आणि "कमवा आणि शिका" योजने अंतर्गत बारावी आर्ट्स मधून पूर्ण केली आणि प्रशांत उर्फ खंडू ने कॉमर्स घेतले. परंतु बिकट आर्थिक परिस्थिती मुळे व जबाबदाऱ्या मुळे त्याने ही कॉमर्स सोडले. आणि दोघांनी ही जयसिंगपूर कॉलेज मध्ये बी. ए. च्या प्रथम वर्षास प्रवेश घेतला. मी कधीच कॉलेज ला जात नसे पण खंडू मात्र प्रत्येक लेक्चर अगदी प्रामाणिक पणे attend करायचा, एव्हाना मी घरातून वेगळा राहायला लागलो होतो. बघता बघता वर्ष संपत आले, आणि परीक्षा जवळ आली. मी कधीच कॉलेज ला न गेल्या मुळे आता परीक्षेस बसण्याची आशा सोडून दिली होती आणि परीक्षा अगदी 15 दिवसांवर आली होती. काय करावे समजत नव्हते. एक दिवस असेच फिरत असता विक्रम थेटर जवळ खंडू भेटला तो पण तिथे एका एस. टी. डी. मध्ये नोकरी करत असे. त्याने परीक्षे च्या तयारी बद्दल विचारले तर मी परीक्षेस न बसण्याचा माझा निर्णय सांगितला. पण तोच माझ्या जीवनातील निर्णायक क्षण होता त्यानेच मला Motivate केलं. म्हणाला " 15 दिवस सुद्धा खूप झाले, तू काही काळजी करू नको, संध्याकाळी घरी ये आणि मी तुला सांगतो तेवढ कर" आता मात्र माझ्या आशा पल्लवित झाल्या. धिरात धीर आला. त्या संध्या काळी मी पहिल्यांदा च प्रशांत उर्फ खंडू च्या घरी गेलो. साध्या विटां मध्ये बांधलेले कौलारू घर शेणाने सारवलेली जमीन आणि एक छोटी प्रशांत ची खोली. प्रशांत च्या आई पण कामाला जायच्या... अण्णा म्हणजे त्याचे वडील छोटा मोठा व्यवसाय करायचे हातावरचे पोट आणि खंडू वर ही लवकरच जबाबदारी आली होती. त्यावेळी समजले अशा कठीण परिस्थिती तून जाणारा मी एकटा नव्हतो, मी. जसा एस टी डी मध्ये बसायचो, खानावळीत जेवायचो तसेच खंडू सुद्धा एस. टी. डी. मध्ये बसायचा, थोड्या अर्थार्जना च्या आशेने बी. एड. महाविद्यालया समोर तक्ते ( Charts) तयार करून विकायचा, खंडू ने त्याच्या सर्व वह्या मला दिल्या ज्या मध्ये त्याने प्रत्येक तासाला बसून ज्या नोट्स काढल्या होत्या... पण केवळ त्या नोट्स पुरेशा नव्हत्या. अशा वेळेस प्रशांत ने काही पुस्तके ही विकत घेतली होती ती पुस्तके दिली. परंतु या पुस्तकांचे एक एक च सेट असल्याने एकावेळी एकजण च वाचू शकत असे , म्हणून मग आम्ही एका पुस्तकाचे फाडून दोन भाग करीत असू एक त्याने वाचायचा आणि एक मी वाचायचो व नंतर अडला बदली करायची त्याच्या शेणाने सारवलेल्या खोली मध्ये चाळीस चा बल्ब 💡 लाऊन केलेला अभ्यास मी आयुष्य भर विसरू शकत नाही. गौतम बुद्धांना जशी बोधी वृक्षा खाली ज्ञानाची प्राप्ती झाली होती तशीच मला सुद्धा त्या 10 बाय 10 च्या खोली मध्ये ज्ञान प्राप्ती झाली. अभ्यासाचे खूप सारे मजेशीर किस्से आहेत ते पुढील भागात लिहीन. क्रमशः
-शेखर गंगधर
९८५०००९९०


Comments
Post a Comment